स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही काळदरीतील नागरिकांना एसटीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:03 AM2021-08-15T04:03:26+5:302021-08-15T04:03:26+5:30
सोयगाव : स्वातंत्र्याच्या तब्बल ७४ वर्षांनंतरही सोयगाव तालुक्यातील आदिवासी काळदरी गावात परिवहनची बस पोहोचलीच नाही. या गावात राहणाऱ्या आदिवासी ...
सोयगाव : स्वातंत्र्याच्या तब्बल ७४ वर्षांनंतरही सोयगाव तालुक्यातील आदिवासी काळदरी गावात परिवहनची बस पोहोचलीच नाही. या गावात राहणाऱ्या आदिवासी समाजबांधवांना अजूनही बाहेरगावी जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
सोयगाव, कन्नड आणि चाळीसगाव या तीन तालुक्यांच्या सीमेवर डोंगरदऱ्यात आदिवासी काळदरी गाव वसलेले आहे. कन्नड मतदार संघात या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. सोयगाव तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या आदिवासी काळदरी गाव अजूनही अनेक सुविधांपासून वंचित आहे. शासकीय योजना तर जाऊ द्या. यात आदिवासी समाजाच्या योजनांचाही या गावाला लाभ झाला नाही.
------
सात किलोमीटर जावे लागते पायी
एकीकडे शासन गाव तिथे एसटी असे सांगून सेवा देत आहे, परंतु काळदरी गावकऱ्यांना याचा कधी लाभ मिळालाच नाही. प्रवासाच्या मूलभूत सोयी नसल्याने या गावातून नागद, कन्नड, बनोटीपर्यंत पायी जावे लागते. ७४ वर्षांपासून या आदिवासी समाजवस्तीतील नागरिक वंचित आहेत. गावापासून सात किमी अंतरावर असलेल्या वडगाव फाट्यापर्यंत पायी जावे लागते. या ठिकाणी ग्रामस्थांना केवळ एकमेव असलेली चाळीसगाव बस दिसते.
----
पावसाळ्यात कोकणातील नजारा
डोंगराच्या चारही बाजूंनी वेढलेल्या आदिवासी काळदरीला मात्र कोकणाचे वैभव प्राप्त झालेले आहे. पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ असल्याने हा नजारा मनमोहक असतो. मात्र, येथील नागरिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
140821\img_20210603_155024.jpg
आदिवासी काळदारी गावाला बसची प्रतीक्षा