रोज घास अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:28 AM2018-01-26T00:28:38+5:302018-01-26T00:28:43+5:30
येथील सैनिक भवन परिसरात शहिदांना मानवंदना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी लावलेल्या रोपट्यांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे. सैनिकांच्या कष्टावर, त्यागावर देशाचे भवितव्य अवलंबून असते, अशा सैनिकांप्रती देश कृतज्ञ असतो. याच भावनेतून येथे शहिदांच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात म्हणून वृक्षारोपण करण्यात आले होते. इतकेच नाही तर त्या झाडांच्या संरक्षक जाळ्या त्या-त्या शहिदांच्या नावाने लावण्यात आल्या आहेत. चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ या मोहिमेद्वारे गावातील सुपुत्रांनी श्रमदानातून खड्डे खोदले होते. त्याच खड्डयामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आले होते.
दत्ता मोरस्कर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचनवेल : येथील सैनिक भवन परिसरात शहिदांना मानवंदना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी लावलेल्या रोपट्यांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे.
सैनिकांच्या कष्टावर, त्यागावर देशाचे भवितव्य अवलंबून असते, अशा सैनिकांप्रती देश कृतज्ञ असतो. याच भावनेतून येथे शहिदांच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात म्हणून वृक्षारोपण करण्यात आले होते. इतकेच नाही तर त्या झाडांच्या संरक्षक जाळ्या त्या-त्या शहिदांच्या नावाने लावण्यात आल्या आहेत. चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ या मोहिमेद्वारे गावातील सुपुत्रांनी श्रमदानातून खड्डे खोदले होते. त्याच खड्डयामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आले होते.
यावेळी स.पो.नि. अभिजित मोरे, मंडळ अधिकारी शिवाजी भाग्यवंत तसेच गावातील आजी -माजी सैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.
शूरा मी वंदिले...
नाचनवेल येथे या शूर शहिदांच्या नावे वृक्षारोपण केले आहे. त्यात कडूबा बनसोड (पाथरी), सांडू दांडगे (सारोळा पिराचे), भास्कर पातोड (अकोला), संजय नीळ (निमडोंगरी), सुधाकर घुले (खुलताबाद), विष्णू चव्हाण (जरंडी), कैलास वाघ (बदनापूर), कैलास जाधव (वारेगाव), रवींद्र सुरडकर( पारध), चंद्रभान पवार (जातवा), राजू गायकवाड (नायगाव), बाळू पेहरकर (गणोरी) आदींसह परमवीर अब्दुल हमीद आणि माजी राष्टÑपती स्व. अब्दुल कलाम यांच्याही नावाने येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. येथे शंभरापेक्षा अधिक भूमीपुत्रांचे सैन्यात योगदान असून शेजारील आदर्श सांसद ग्राम आडगाव तर सैनिकांचेच गाव म्हणून ओळखले जाते. सगळेजण जेव्हा आनंदात दिवाळी साजरी करतात, त्यावेळी येथे ‘एक दिया शहिदोंके नाम’ हा कार्यक्रम घेण्यात येऊन शाहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते.