हृदयरोग उपचार शिबिरात ४५ रुग्णांची तपासणी
By | Published: November 26, 2020 04:13 AM2020-11-26T04:13:54+5:302020-11-26T04:13:54+5:30
औरंगाबाद : महावीर इंटरनॅशनल केंद्र व सेवाभावी संस्थेच्या वतीने उल्कानगरी येथे आयोजित मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबिरात ४५ ...
औरंगाबाद : महावीर इंटरनॅशनल केंद्र व सेवाभावी संस्थेच्या वतीने उल्कानगरी येथे आयोजित मोफत हृदयरोग तपासणी व उपचार शिबिरात ४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
‘लोकमत’चे एडिटर इन चीफ आणि संस्थेचे संस्थापक सल्लागार राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन सीए जी. एम. बोथरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अहमदनगर येथील आनंदऋषी हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमित थोपटे, डॉ. राहुल एरंटे, डॉ. रवींद्र येलीकर, डॉ. सुजाता गायकवाड यांनी ४५ रुग्णाची तपासणी केली. त्यांना ८ नर्स व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सर्व रुग्णाची ईसीजी व रक्तातील शुगर तपासणी करण्यात आली. यावेळी असे सांगण्यात आले की, ज्या रुग्णांना एंजियोग्राफी आवश्यकता आहे, अशा ३ रुग्णांची तपासणी निःशुल्क करण्यात येईल. या शिबिरात शहरातील व आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्ण सहभागी झाले होते. शिबीर यशस्वीतेसाठी महावीर डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. अक्षय ठोले, मो. इंजमाम, सचिन कटारे, संदेश साठे आदींनी परिश्रम घेतले.