खळबळजनक! भाडेकरूच्या घरात गोळीबार; अडीच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 10:48 PM2023-08-25T22:48:59+5:302023-08-25T22:49:45+5:30
गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर परिसरातील खळबळजनक घटना
- जयेश निरपळ
गंगापूर: भाडेकरू म्हणून राहत असलेल्या कुटुंबाच्या घरात झालेल्या गोळीबारात अडीच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना शहरातील अहिल्यादेवीनगर परिसरात शुक्रवारी(२५)रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली;आर्यन राहुल राठोड असे गोळीबारातील जखमी मुलाचे नाव आहे
याविषयी अधिक माहिती अशी की शहरातील अहिल्यादेवीनगर येथे नवनाथ अंबादास भराड यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर बीड येथील दाम्पत्य राहुल राठोड(२९)पत्नी संगीता राहुल राठोड व त्यांचा अंदाजे अडीच वर्षांच्या मुलगा आर्यनसह भाडेकरू म्हणून चार महिन्यापासून राहत होते,राहुल हा शहरातील खाजगी कर्ज वितरण करणाऱ्या बँकेत कामाला असून शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक जोराचा आवाज झाला त्यानंतर संगीता व राहुल जखमी मुलगा आर्यनला घेऊन येथील विठाई दवाखान्यात गेले यावेळी आर्यनची आई संगीता या मुलाला गोळी लागली, मुलाला गोळी लागली असं म्हणून जोरजोरात रडत होत्या त्यामुळे परिसरातील महिला घाबरून घराच्या बाहेर आल्या व त्यांनी येथील रहिवासी राहुल वानखेडे यांना माहिती दिल्याने त्यांनी पोनि सत्यजित ताईतवाले यांना घटनेबद्दल माहिती दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराची झडती घेतली असता स्वयंपाक घरामध्ये पोटमाळीवर गावठी कट्टा आढळून आला त्यातील मॅगझीनमध्ये तिन गोळ्या लोड केलेल्या होत्या यातील दोन गोळ्या झाडल्या गेल्या होत्या यावेळी घरात जागोजागी रक्ताचे थेंब पडले होते
परत येऊन कट्टा ठेवला लपवून
गोळीबारामध्ये जखमी मुलाला घेऊन राहुल व संगीता दवाखान्यात गेले दवाखान्यात जात असताना मुलाची आई गोळी लागली गोळी लागली असे म्हणून जोरात रडत होती त्यामुळे गोळीबार झाला आहे हे परिसरातील नागरिकांना समजेल व आपले पितळ उघडे पडेल या भीतीने राहुल राठोड हा मुलाला दवाखान्यात दाखल करून घाई घाईने काही वेळासाठी घरी आला व गोळीबार झालेला कट्टा पोटमाळीवर लपवून घराला पुढील बाजूने कुलूप लावून पुन्हा मुलाकडे पोहोचल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले त्यांनतर राहुल जखमी आर्यनवर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी मध्ये घेऊन गेला;आर्यन गंभीर जखमी असून कपाळाच्या मधोमध त्याला गोळी लागली आहे अशी माहिती त्याच्यावर प्राथमिक उपचार करणारे डॉ.राजेश गुडदे यांनी दिली
बँक कर्मचाऱ्याकडे कट्टा आला कसा ?
भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व साधा बँक कर्मचारी असलेल्या राहुल राठोड याच्याकडे कट्टा कुठून आला? त्याची यापूर्वीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे क? घरात गोळीबार नेमका कसा झाला गोळीबारात आर्यांच्या डोक्याच्या मधोमध गोळी कशी लागली असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे
गोळीबार झाल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली होती तसेच अचानक झालेल्या गोळीबाराने शहरासह परिसरामध्ये खळबळ उडाली होती त्यामुळे गोळीबार झालेल्या अहिल्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती;घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले,पोनि सत्यजित ताईतवाले,पोउनि दीपक आवटी,राहुल पगारे,विजय नागरे संदीप घुसिंगे,कैलास राठोड विजय पाखरे,अभिजीत डहाळे,अमोल कांबळे,अमोल नांगरे,अर्जुन सिंगल यांच्या पथकाने पंचनामा केला व अधिक माहितीसाठी एक पथक जखमी आर्यन उपचार घेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल झाले होते