पैठण शिवारात चोरीच्या गाड्या तोडून भंगारात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:42 PM2021-03-15T23:42:50+5:302021-03-15T23:45:10+5:30

ट्रव्हल बस अवघ्या चार ते पाच तासात तोडणाऱ्या या टोळीने आणखी बऱ्याच फोरव्हिलर तोडून भंगारात विकल्या असण्याची शक्यता

Exposure of a gang who selling stolen broken vehicles in Paithan Shivara | पैठण शिवारात चोरीच्या गाड्या तोडून भंगारात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पैठण शिवारात चोरीच्या गाड्या तोडून भंगारात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext

पैठण : पैठण शिवारात मुंबई बोरिवली येथून चोरून आणलेली नवी कोरी ट्रव्हल्स बस तोडताना पैठण पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले आहे. चोरीच्या फोरव्हिलर गाड्या तोडून त्या भंगारात काढणारी टोळी या निमित्ताने पोलीसांच्या हाती लागली असून गाड्या तोडणारे दोघेही शेवगाव जि. अहमदनगर येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ट्रव्हल बस अवघ्या चार ते पाच तासात तोडणाऱ्या या टोळीने आणखी बऱ्याच फोरव्हिलर तोडून भंगारात विकल्या असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी जावेद शेख (३३) व बहिरा व मुका असलेला एक जण  दोघेही रा. शेवगाव जि अहमदनगर  यांना बस तोडताना रंगेहात ताब्यात घेतले आहे. पैठण शिवारात टाटा कंपनीची २०१९ मध्ये नोंदणी झालेली बस क्रमांक  MH.04.JU.4257 तोडण्यात येत होती. सदर बस बोरिवली येथून चोरून आणली असल्याचे जावेदने सांगितले. या बाबत बोरिवली वेस्ट पोलीस ठाण्यात  आयडियल ट्रव्हल्स कंपनीने ही बस चोरीस गेल्याची फिर्याद पंधरा दिवसापूर्वी दिली होती. पैठण पोलिसांनी या बाबत बोरीवली पोलीसांना कल्पना दिली आहे.

पैठण आखतवाडा या फारशा वापरात नसलेल्या जुन्या कच्च्या रस्तावर पैठण पासून तीन किलोमीटर अंतरावर बाभळीच्या आडोशात काही लोक नवीन बस तोडत असल्याची खबर पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना खबऱ्याने दिली. पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, छोटुसिंग गिरासे व पो कॉ चरणसिंग बालोदे दोन मोटारसायकलने घटनास्थळी पोहचले, पोलीसांना पाहताच बस तोडणारा जावेद तेथून पळाला, मुका बहिरा ताब्यात घेऊन  बालोदे, व पोलीस उपनिरीक्षक सागडे यांनी जावेदचा दोन किलोमीटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

फोरव्हिलर गाड्या चोरून आणायच्या काही तासात गाड्याचे पार्ट पार्ट मोकळे करायचे व भंगारात विकायचे असा धंदा या टोळीचा असून टोळीचे सुत्र अहमदनगर जिल्ह्यातून हलवले जात असल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात याच ठिकाणी ईंडिका कार तोडल्याचे आरोपी जावेदने सांगितले. दरम्यान गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलीस तपासात अन्य आरोपी उघड होतील असे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

Web Title: Exposure of a gang who selling stolen broken vehicles in Paithan Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.