पीएच.डी.च्या नोंदणीला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:14 AM2017-12-19T00:14:52+5:302017-12-19T00:14:56+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मागील वर्षी जुलै महिन्यात मागविलेल्या पेट-४ अर्जानंतर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालास चार महिने उलटून गेल्यानंतर ‘आरआरसी’ समितीसमोर संशोधनाचा विषय सादर करण्यासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात केली होती. हे अर्ज दाखल करण्याचा सोमवार (दि.१८) शेवटचा दिवस होता. यास आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

 Extension of Ph.D. registration | पीएच.डी.च्या नोंदणीला मुदतवाढ

पीएच.डी.च्या नोंदणीला मुदतवाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मागील वर्षी जुलै महिन्यात मागविलेल्या पेट-४ अर्जानंतर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालास चार महिने उलटून गेल्यानंतर ‘आरआरसी’ समितीसमोर संशोधनाचा विषय सादर करण्यासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात केली होती. हे अर्ज दाखल करण्याचा सोमवार (दि.१८) शेवटचा दिवस होता. यास आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
विद्यापीठाने पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश परीक्षा (पेट-४) घेण्यासाठी मागील वर्षी ३० जुलै २०१६ रोजी अर्ज मागवण्यास सुरुवात केली होती. यानंतर परीक्षा आॅनलाईन घ्यायची की आॅफलाईन या घोळामध्ये वर्ष उलटून गेले. शेवटी पेट-४ ची आॅनलाईन परीक्षा १४ व १५ जुलै रोजी घेण्यात आली. या परीक्षेतही निगेटिव्ह गुणांकन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष होता. या रोषापुढे (पान २ वर)
सम्यक विद्यार्थी आंदोलनचे प्रयत्न
अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यात अनेकांना मार्गदर्शक मिळत नाही. मार्गदर्शकांच्या आभावामुळे संशोधन विषय निवडण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे यांनी प्रशासनाला निवेदन देत नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी केली. ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे.
पीएच.डी. मार्गदर्शकांचा तिढा सुटेना
विद्यापीठात कोणत्या विषयांचे किती मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडे रिक्त जागांचे प्रमाण, मार्गदर्शक होण्यास पात्र असलेल्या प्राध्यापकांच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आलेले नाहीत.
अनेक मार्गदर्शकांकडे जागा रिक्त नसताना विद्यापीठाच्या वेबसाईटवर जागा दाखविण्यात आलेल्या आहेत.
यामुळे पीएच.डी.साठी इच्छुक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हे वातावरण दूर करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी करण्याची
गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title:  Extension of Ph.D. registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.