शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:24+5:302021-06-16T04:06:24+5:30

सदर शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. भास्कर त्रिंबक इधाटे (३८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ...

Farmer drowns in farm | शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

सदर शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. भास्कर त्रिंबक इधाटे (३८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

शेलगाव खुर्द येथील साहेबराव शेनफड इधाटे यांच्या शेततळ्यात भास्कर इधाटे यांचा मृतदेह आढळला. मयताचे फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची वडोदबाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सततच्या नापिकीमुळे भास्कर इधाटे कायम तणावात राहायचे. त्यांच्या वडिलांवर बँकेचे व त्यांच्यावर खाजगी लोकांचे कर्ज होते. ते कसे फेडावे याची चिंता त्यांना होती. यातच पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याने ते निराश होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Farmer drowns in farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.