शेतकऱ्यांचा असंतोष रस्त्यावर

By Admin | Published: September 14, 2015 11:52 PM2015-09-14T23:52:09+5:302015-09-15T00:32:55+5:30

उस्मानाबाद : जिल्हा तीव्र दुष्काळी झळांचा सामना करीत असताना शासन, प्रशासन आवश्यक उपाययोजना करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत

Farmers' discontent on the road | शेतकऱ्यांचा असंतोष रस्त्यावर

शेतकऱ्यांचा असंतोष रस्त्यावर

googlenewsNext



उस्मानाबाद : जिल्हा तीव्र दुष्काळी झळांचा सामना करीत असताना शासन, प्रशासन आवश्यक उपाययोजना करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यातील दहा ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
उस्मानाबाद शहरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील चौकात माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची गर्दी होत होती. अकराच्या सुमारास डॉ. पाटील यांचे तेथे आगमन झाले. यावेळी तेथे सुमारे तीन हजारावर आंदोलनकर्ते उपस्थित होते. डॉ. पाटील यांच्यासह नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर, अमोल पाटोदेकर, कैैलास पाटील, सत्यनारायण दंडनाईक व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अर्ध्या तासानंतर सोडून दिले.
तालुक्यातील ढोकी येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. येथेही शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी अडचणी कायम आहेत. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर असून, एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंट झालेले नाही. सद्यस्थितीत एकच छावणी सुरू आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. हाच संताप या गर्दीच्या उपस्थितीवरून स्पष्ट होत असल्याचे राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले. कर्जमाफीबद्दल शासन मुग गिळून आहे. दुसरीकडे रोहयो कामेही सुरू नाहीत. ही कामे तात्काळ सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
परंड्यात राज्यमार्ग रोखला
परंडा : येथील शिवाजी चौकात आ. राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी परंडा-बार्शी, परंडा-करमाळा हे राज्यमार्ग रोखून धरले. आंदोलनावेळी आ. मोटे यांनी युतीचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील असल्याचा आरोप केला. आंदोलनानंतर आ. मोटेंसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली. आंदोलनात तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, गटनेते जाकीर सौदागर, रायुकाँचे तालुकाध्यक्ष धनंजय हांडे, शहराध्यक्ष वाजीद दखनी, माजी नगरसेवक राहुल बनसोडे, नसीर शहाबर्फीवाले, दादासाहेब सोनारीकर, राजकुमार पाटील, गणेश राशीनकर, नवनाथ जगताप, दीपकराजे भांडवलकर, बापू मिस्कीन, धनंजय मोरे, दत्तात्रय पाटील, महेश खुळे, बाळासाहेब पाटील, हणमंत धुमाळ, रवि मोरे, मलिक सय्यद, राजा माने, घन:श्याम शिंदे, जयंत शिंदे, जयपाल बगाडे, नंदकुमार शिंदे, श्रीहरी नाईकवाडे, बाबासाहेब जाधव, पंकज पाटील, वाहेद शहाबर्फीवाले, मकसूद पल्ला, आरीफ बागवान आदी सहभागी झाले होते.
लोहारा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील महात्मा फुले चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. ही रॅली शिवाजी चौकात आल्यानंतर येथे जेलभरो आंदोलन झाले. या आंदोलनात उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल पाटील, तालुकाध्यक्ष किशोर साठे, अ‍ॅड. दादासाहेब जानकर, गोविंदराव साळुंके, दिनकरराव जावळे, दयानंद गिरी, जयदीप थिटे, जयश्री वाघमारे, शरीफा सय्यद, आयुब शेख, विजय लोमटे, मुख्तार चाऊस, नरदेव कदम, आप्पा देवकर, अमिन सुंबेकर, महादेव बंडगर, विठ्ठल साठे, शिवाजी इंगळे, भास्कर ढोणे, मुबारक गवंडी, बबन फुलसुंदर, प्रशांत गिराम, हणमंत दणाने, शाहुराज नेलवाडे, हेमंत माळवदकर, मिलिंद नागवंशी, लक्ष्मण रसाळ यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनास तहसीलदार ज्योती चौहान, नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांनी भेट दिली. माजी तालुकाध्यक्ष दिनकरराव जावळे यांनी आभार मानले. पोनि संतोष गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Farmers' discontent on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.