थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:38 AM2018-08-09T00:38:47+5:302018-08-09T00:39:42+5:30

बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.

Farmers to Tackle FRP | थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

थकीत एफआरपीसाठी शेतकऱ्यांचे धरणे

googlenewsNext
ठळक मुद्देबीडहून आले ऊस उत्पादक : साखर सहसंचालकांच्या कार्यालयाला होते कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मागील ८ महिन्यांपासून एफआरपी (फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस) न दिल्याच्या निषेधार्थ तेथील ऊस उत्पादकांनी बुधवारी (८ आॅगस्ट) प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कर्मचारी संपामुळे कार्यालय कुलूपबंद असल्याने संतापलेल्या शेतकºयांनी अखेर क्रांतीचौकात धरणे आंदोलन सुरू केले.
क्रांतीचौकात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे कार्यालय आहे. बीड जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक ऊस उत्पादकांनी या इमारतीत जिन्याच्या पायºयावर बसून आंदोलन सुरू केले. कर्मचारी संपावर असल्याने आज या कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. प्रादेशिक सहसंचालक एन. व्ही. गायकवाड यादेखील कार्यालयात आल्या नाहीत. साखर कारखानदार आणि सरकारविरोधात ऊस उत्पादकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. बीड जिल्ह्यातील शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी सांगितले की, माजलगाव येथील जयमहेश शुगर इंडस्ट्रिज, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती सहकारी, अशा तीन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर दिलेला नाही. ही रक्कम सुमारे १५० कोटींपर्यंत आहे. मागील ८ महिन्यांपासून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभावावर सरकारने तूर, मका खरेदी केला; पण त्याची रक्कम खात्यावर जमा झाली नाही, तसेच कर्जही मिळाले नाही. शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या आंदोलनात वसंत सोनवणे, शेख युनूस, गणेश साळुंके, शिवाजी शिंदे, बालाजी फुंडकर, लक्ष्मण भागवत, राजू पठाडे, अशोक गायकवाड, सय्यद पठाण यांच्यासह ऊस उत्पादक हजर होते.
जोरदार घोषणाबाजी
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी प्रादेशिक सहसंचालकांच्या (साखर) कार्यालयाच्या तीन मजली इमारतीत दिवसभर धरणे आंदोलन केले. ‘ऊस उत्पादकांचे पैसे मिळालेच पाहिजेत’, पैसे आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.
मुलीचे लग्न जमले, पैसे नाहीत खात्यात
निपाणी टाकळी येथील हनुमाननगरातील रहिवासी गणपत चव्हाण यांनी आपल्या मुलीची लग्नपत्रिका आणली होती. ४ सप्टेंबर रोजी मुलीचे लग्न ठरविले आहे, असे सांगत चव्हाण म्हणाले की, साखर कारखान्यांनी एफआरपी दिला नाही. ८ महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहे. मुलीचे पुढील महिन्यात लग्न आहे. बँकेतील खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

Web Title: Farmers to Tackle FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.