औरंगाबादमध्ये नारीशक्तीचे मतदान १ लाख ७७ हजारांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 05:19 PM2019-04-12T17:19:16+5:302019-04-12T19:05:20+5:30
मतदारसंघात १ लाख ७७ हजार महिला मतदारांची भर
औरंगाबाद : मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १ लाख ७७ हजार ३३४ महिला मतदारांची वाढ झाली आहे. या निवडणुकीत नारीशक्तीचे हे मतदान निर्णायक ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम तसेच मतदार नोंदणीसाठी मोहीम राबविली. त्यामुळे मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. लोकसभा मतदारसंघ विभागणीत तीन विधानसभा मतदारसंघ जालना क्षेत्रात जोडले गेले आहेत. पैठण, सिल्लोड व फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. ८ लाख ९२ हजार २१७ महिला मतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत, तर जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ४ लाख ३५ हजार ५०८ महिला मतदार आहे. पूर्ण जिल्ह्यात १३ लाख २७ हजार ७२५ महिला मतदार आहेत.
वाढलेले महिला मतदार
मतदारसंघ महिला मतदार
कन्नड : २१७११
औरंगाबाद मध्य : ३३५४०
औरंगाबाद पश्चिम : ३९९४६
औरंगाबाद पूर्व : ३५०६४
गंगापूर : २४१८८
वैजापूर : २२८८५
एकूण : १७७३३४