औरंगाबाद : मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १ लाख ७७ हजार ३३४ महिला मतदारांची वाढ झाली आहे. या निवडणुकीत नारीशक्तीचे हे मतदान निर्णायक ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम तसेच मतदार नोंदणीसाठी मोहीम राबविली. त्यामुळे मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. लोकसभा मतदारसंघ विभागणीत तीन विधानसभा मतदारसंघ जालना क्षेत्रात जोडले गेले आहेत. पैठण, सिल्लोड व फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. ८ लाख ९२ हजार २१७ महिला मतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत, तर जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ४ लाख ३५ हजार ५०८ महिला मतदार आहे. पूर्ण जिल्ह्यात १३ लाख २७ हजार ७२५ महिला मतदार आहेत.
वाढलेले महिला मतदारमतदारसंघ महिला मतदार कन्नड : २१७११औरंगाबाद मध्य : ३३५४०औरंगाबाद पश्चिम : ३९९४६औरंगाबाद पूर्व : ३५०६४गंगापूर : २४१८८वैजापूर : २२८८५एकूण : १७७३३४