शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

अखेर १०० कोटींच्या कामांचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:01 AM

मुख्यमंत्र्यांनी तीन आठवड्यांपूर्वी भूमिपूजन करूनही रुतलेले १०० कोटीतून होणाऱ्या ३० रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे गाडे नगरसेवकांनी आगपाखड केल्यानंतर सोमवारपासून किंचित हालले. टीव्ही सेंटर ते मध्यवर्ती जकातनाका या रस्त्यावर प्रत्यक्षात कामही सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देरस्ते ताब्यात : साफसफाई, रोड लेव्हल करण्याचे काम सुरू

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी तीन आठवड्यांपूर्वी भूमिपूजन करूनही रुतलेले १०० कोटीतून होणाऱ्या ३० रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे गाडे नगरसेवकांनी आगपाखड केल्यानंतर सोमवारपासून किंचित हालले. टीव्ही सेंटर ते मध्यवर्ती जकातनाका या रस्त्यावर प्रत्यक्षात कामही सुरू करण्यात आले.खड्ड्यांचे शहर म्हणून सर्वत्र पर्यटनाच्या राजधानीची बदनामी होऊ लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०१७ मध्ये शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी दिला. या निधीतून कोणते रस्ते गुळगुळीत करायचे यावर मनपाच्या कारभाºयांत एकमत होईना. कामे कोणी करावी म्हणून कंत्राटदारही आपसात भांडू लागले. दीड वर्षातील वाद मिटवून अखेर ३ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तरीही एकाही रस्त्याचे काम मनपाने सुरू केलेले नव्हते.नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. कामे कधी सुरू करणार तारीख सांगा, असे नगरसेवकांनी ठणकावले. परंतु निगरगठ्ठ प्रशासनाने शेवटपर्यंत तारीख सांगितलीच नाही. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारपासून (दि.२१) कामे सुरू होतील, असे शेवटी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी कामगार चौक परिसर, टीव्ही सेंटर ते एन-६ स्मशानभूमी, या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील ३० रस्त्यांसाठी चार कंत्राटदार नेमले आहेत. दोन कंत्राटदारांनी काम सुरू केले. इतर दोघांनी काम सुरू केले नाही.पाच दिवस उलटलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील आणखी काही रस्ते सिमेंटचे तयार करावेत म्हणून १२५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. १६ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास रस्त्यांवर चर्चा करण्यात आली. शेवटी यादी तयार करण्याचे अधिकार महापौर व इतर पदाधिकाºयांना देण्यात आले. आठ दिवसांमध्ये यादी तयार करून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन महापौरांनी दिले होते. त्यातील पाच दिवस सोमवारी संपले. अद्याप पदाधिकाºयांनी यादी तयार केली नाही. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेत १२५ कोटींचा निधी अडकून पडण्याची दाट शक्यता आहे.-----------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा