मायलेकीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अनोळखीला शोधले हातावरील गोंधणावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:26 PM2019-04-11T23:26:31+5:302019-04-11T23:26:50+5:30

घरी जाण्यासाठी लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून मायलेकीला बायपास परिसरातील निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºया अनोळखी आरोपीस हातावरील गोंधणावरून ओळख पटवून जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या.

Finding strangers unknowingly, who discovered pornography with Miley | मायलेकीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अनोळखीला शोधले हातावरील गोंधणावरून

मायलेकीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अनोळखीला शोधले हातावरील गोंधणावरून

googlenewsNext
ठळक मुद्देजवाहरनगर पोलिसांच्या प्रयत्नाला यश : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मायलेकींसोबत अश्लील कृत्य करून आरोपी झाला होता पसार, वडिलाच्या खुनातील आरोपी

औरंगाबाद : घरी जाण्यासाठी लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून मायलेकीला बायपास परिसरातील निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºया अनोळखी आरोपीस हातावरील गोंधणावरून ओळख पटवून जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी रात्री बेड्या ठोकल्या.
किशोर विलास आव्हाड (२२, रा. राजनगर) असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २५ मार्च रोजी रात्री ३० वर्षीय पीडिता ७ वर्षीय मुलीला सोबत घेऊन शहानूरमियाँ दर्गा परिसरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी आली होती. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी ती निघाली तेव्हा तिच्याजवळ दहा रुपयेच उरले होते. शिवाय घराकडे जाण्यासाठी तिला रिक्षा मिळत नव्हती. तिच्यावर नजर ठेवून असलेला आरोपी किशोर अचानक तिच्याजवळ आला आणि तुम्हाला कोठे जायचे आहे, असे विचारले. मी तिकडेच जात आहे, तुम्हाला सोडून देतो, असे म्हणून त्याने मायलेकीला दुचाकीवर बसविले. मायलेकीला घराकडे न नेता राजनगर परिसरातील नाल्याजवळ नेले. निर्जनस्थळी अचानक खिशातून चाकू काढून त्याने पीडितेला तिच्या चिमुकलीसमोर अंगावरील कपडे काढायला लावले. चिमुकली आरडाओरड करून रडू लागल्याने त्याने चिमुक लीला चूप बस नाही तर तुम्हाला मारून टाकीन, असे धमकावले. तेथे पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार करताच आरोपीने मायलेकीला धमकावत तेथून पळ काढला. घाबरलेल्या मायलेकी घरी परतल्या आणि दुसºया दिवशी सकाळी त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
केवळ वर्णनाच्या आधारे शोधले आरोपीला
पीडितेला आरोपीचे नाव माहीत नव्हते. पीडितेच्या मुलीने मात्र आरोपीच्या उजव्या हातावर सुरेखा आणि अंगठ्याजवळ इंग्रजीत के अक्षर गोंधलेले असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीने डाव्या हाताच्या मनगटावर केशरी रंगाचा धागा बांधलेला, गळ्यात दहा रुपयांचे नाणी बांधलेले आणि कानात बाळी घातलेली, असे वर्णन पीडितेने पोलिसांना दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे, सहायक उपनिरीक्षक दत्ता बोटके, पोलीस नाईक विजय वानखेडे, पोलीस मित्र रवी हाटकर आणि सिद्धांत राणा हे आरोपींचा शोध घेत होते. खबऱ्यांनाही त्यांनी कामाला लावले होते. पोलिसांच्या तपासाला यश आले आणि बुधवारी रात्री आरोपी किशोरला बेड्या ठोकण्यात त्यांना यश आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Finding strangers unknowingly, who discovered pornography with Miley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.