वाळूज महानगर: सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकाम व रेखाकंन केल्याप्रकरणी दोन बिल्डरांविरुध्द सोमवारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मारुती बबन मेंढे व दया भाऊराव मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांची नावे आहेत.
वडगाव कोल्हाटी येथील गट क्रमांक ९ व १० मध्ये मारुती मेंढे व दया मोहिते यांनी न्यू जगदंबा हौसिंग सोसायटीच्या नावाखाली भूखंड पाडून त्याची विक्री केलेली आहे. याचबरोबर निवासी गाळे बांधत असल्याची तक्रार चेनराज फुलपगार यांनी सिडकोकडे केली होती.
या तक्रारीनंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या गट नंबर मध्ये पाहणी केली असता अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे दिसून आले. त्यामुळे सिडको प्रशासनाने महाराष्टÑ प्रादेशिक व नगर रचना अधिनियण १९६६चे कलम ५४ अन्वये नोटीस बजावली होती. सिडकोच्या अधिकाºयांनी मारुती मेढे व इतराशी संपर्क साधूनही त्यांनी नोटीस घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सिडको प्रशासनाने न्यू जगंदबा हौसिंग सोसायटीच्या बांधकामाच्या ठिकाणी नोटीस डकविण्यात आली.
मात्र, यानंतरही खुलासा व कागदपत्रे सादर न केल्यामुळे सिडको प्रशासनाने बिल्डर मारुती मेंढे व दया मोहिते यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मारुती मेंढे व दया मोहितेंविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या परिसरात ३० ते ४० बिल्डर लॉबीकडून अनधिकृतपणे भूखंड व घराची विक्री केली जात आहे. दरम्यान, तहसीलदार रमेश मुनलोड यांनीही वडगाव परिसरात या अनधिकृत प्लॉटींग पाडून बांधकाम व रस्ते करणाºया बिल्डराविरुध्द कारवाई करण्यास पुढाकार घेतला होता. आता सिडको प्रशासनाचे कारवाईला बडगा उगारल्यामुळे बिल्डरलॉबीचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
नोंदी व रजिस्ट्री करणा-यावर कारवाई कधीवडगाव कोल्हाटी येथील खाजगी गट नंबरमध्ये अनेक बिल्डरांनी अनधिकृतपणे भूखंड व घराची विक्री केली आहे. या गटनंबरमधील भूखंडाच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ ला घेण्यात आल्या आहेत. या भुखंडाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडून रजिस्ट्री करण्यात आल्या आहे. या नियमबाह्य भुखंडाच्या नोंदी घेणाºयाविरुध्द कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकमत इफेक्ट...वडगाव कोल्हाटी व शरणापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृतपणे भूखंड व घराची विक्री बिल्डरलॉबीकडून केली जात असून, नागरिकांची फसवणूक होत असल्याचे वृत्त लोकमतने वेळोवेळी प्रकाशित केले होते. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत सिडको प्रशासनाने बिल्डरांविरुध्द कारवाईचा बडगा उगारला आहे.