पहिले आॅनलाईन जातप्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:40 AM2017-09-03T00:40:55+5:302017-09-03T00:40:55+5:30

जात प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर १ सप्टेंबर रोजी पाथरी येथील संतोष शिवाजी भोरे यांना पहिले आॅनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

First online line certificates | पहिले आॅनलाईन जातप्रमाणपत्र

पहिले आॅनलाईन जातप्रमाणपत्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी: जात प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर १ सप्टेंबर रोजी पाथरी येथील संतोष शिवाजी भोरे यांना पहिले आॅनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
राज्य शासनाने महसूल विभागातील उत्पन्न, रहिवासी, डोमेसाईल आणि इतर प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होणार आहे. या प्रमाणपत्रांबरोबरच जातीचे प्रमाणपत्रही आॅनलाईन देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला. त्यानुसार पाथरी उपविभागीय कार्यालयात १ सप्टेंबर रोजी पहिले आॅनलार्इंन जातप्रमाणपत्र संतोष शिवाजी भोरे यांचे काढण्यात आले. उपविभागीय अधिकारी सी.एस.कोकणी यांच्या हस्ते भोरे यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार वासुदेव शिंदे, नायब तहसीलदार कोकाटे, नितेश भोरे, नगरसेवक साजेद अली राज, अमोल भाले, सुशील भोरे, दत्ता उफाडे, अतुल जोशी, मुंजा गवारे, कुंडकर, वाघमारे, जीवन धारासूरकर आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, आॅनलाईन जातप्रमाणपत्र मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: First online line certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.