बोंडअळीच्या मदतीत फुलंब्रीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:53 AM2018-02-27T00:53:27+5:302018-02-27T00:54:19+5:30

तालुक्यात ६१ हजार शेतकºयाचे ३१ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी पिकाचे पंचनामे करून शासनाला पाठविले होते, पण यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नसल्याचा खुलासा झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

 The flounder will be in front of the bandwagon | बोंडअळीच्या मदतीत फुलंब्रीला ठेंगा

बोंडअळीच्या मदतीत फुलंब्रीला ठेंगा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : तालुक्यात ६१ हजार शेतकºयाचे ३१ हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी पिकाचे पंचनामे करून शासनाला पाठविले होते, पण यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नसल्याचा खुलासा झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
फुलंब्री तालुक्यात बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन पन्नास टक्यांनी कमी झाल्याने लागवडीपासून कापूस वेचणीपर्यंत केलेला खर्चही निघाला नाही. कपाशी पिकावर पडलेल्या बोंडअळीने नुकसान झाल्यानंतर याची नैसर्गिक आपत्तीत गणना करून शेतकºयांना मदत मिळावी म्हणून ओरड झाली. शासनाने याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. सर्वत्र पंचनामे झाले पण नुकसानभरपाई देताना टक्केवारीची अट लावण्यात आली. नैसर्गिक आपत्तीखाली नुकसान झाले तर त्याची टक्केवारी ठरविणे योग्य नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
तालुक्यात कपाशी पिकाचे क्षेत्र ३१ हजार हेक्टर असून ६१ हजार शेतकºयांची संख्या आहे. कपाशी पिकावर मोठ्या बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होऊन शेतकºयांचे नुकसान झाले असताना फुलंब्री तालुक्यातील चार पैकी एकाही कृषी मंडळाचे अनुदानात नाव आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील एकाही शेतकºयाला मदत मिळणार नाही.
तालुक्यात यंदा बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे उत्पादन पन्नास टक्यांनी घटले आहे. यंदा ३१ हजार हेक्टर क्षेत्रात एक लाख ५५ हजार क्विंटल कापूस निघाला. गेल्या वर्षी प्रती एकर ९ ते १० क्विंटल कापूस निघाला होता, तो यंदा केवळ प्रती एकर ५ क्विंटल निघाला. यात शेतकºयाचा लागवडीसाठी लावलेला खर्चही निघाला नाही. याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.
शासनाच्या निकषानुसार नुकसान २८ टक्केच
४तालुक्यातील ३१ हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. त्या पंचनाम्यात ४० टक्यांपर्यंत नुकसान झाले आल्याचा अहवाल शासनाला पाठविला होता, पण शासनाने पिक विमा टप्प्याची तुलना करून बोंडअळीने केवळ २८ टक्केच क्षेत्र बाधित झाले असल्याचा निष्कर्ष काढला व यामुळे शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवले.

Web Title:  The flounder will be in front of the bandwagon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.