१५ वर्षांपासून राष्टÑध्वजाला मोफत इस्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:26 AM2018-01-26T00:26:36+5:302018-01-26T00:26:50+5:30
तालुक्यातील आदर्श किनगाव येथील बाळासाहेब शिंदे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून सर्वच सरकारी कार्यालयातील राष्ट्रध्वजांना ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला मोफत इस्त्री करून देण्याचे अनोखे देशप्रेम जोपासले आहे.
रऊफ शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : तालुक्यातील आदर्श किनगाव येथील बाळासाहेब शिंदे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून सर्वच सरकारी कार्यालयातील राष्ट्रध्वजांना ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला मोफत इस्त्री करून देण्याचे अनोखे देशप्रेम जोपासले आहे.
किनगाव येथे बाळासाहेब शिंदे यांचे परंपरागत इस्त्री करण्याचा व्यवसाय गेल्या वीस वर्षांपासून आहे. राष्ट्रध्वजाबाबत अमाप प्रेम असल्याने ते मोफत इस्त्री करुन देतात.
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, महाराष्टÑ दिन या दिवशी ध्वजारोहण करण्यात येते. त्यामुळे बाळासाहेब शिंदे स्वत: शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात जाऊन राष्ट्रध्वज घेऊन येतात व इस्त्री करून परत जाऊन देतात. राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून दिल्याने मला देशसेवा केल्याची प्रेरणा मिळते, असे शिंदे मोठ्या अभिमानाने सांगतात.
१५ वर्षांत ४२७ राष्ट्रध्वजांना
केली मोफत इस्त्री
वर्षभरातील राष्टÑीय कार्यक्रमांची माहिती तोंडपाठ
बाळासाहेब शिंदे केवळ राष्ट्रध्वजाच्या इस्त्री करण्यापुरते मर्यादित राहात नाहीत तर ते प्रत्येक महत्त्वाचे कार्यक्रम साजरे करतात. महिला दिन, ज्येष्ठ नागरिक दिन, शिक्षक दिन, पत्रकार दिन, राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमातही त्यांचा मोठा सहभाग असतो.
शिवाय सर्वच महापुरुषांच्या पुण्यतिथी, जयंत्याही ते उत्साहात साजºया करतात. वर्षभरातील या सर्व कार्यक्रमाची माहिती त्यांच्याकडे तोंडपाठ आहे.