गॅस्ट्रोच्या रुग्णांची ‘ओपीडी’त गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:22 AM2017-11-21T00:22:07+5:302017-11-21T00:22:11+5:30

छावणी सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाºया गॅस्ट्रोच्या रुग्णांची गर्दी आठ दिवसांनंतरही कायम आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीही रुग्णांचा ओघ सुरू आहे. गर्दीमुळे अतिरिक्त वेळ देऊन रुग्णसेवेची जबाबदारी येथील डॉक्टर पार पाडत आहेत.

 Gastro patients' OPD rush in | गॅस्ट्रोच्या रुग्णांची ‘ओपीडी’त गर्दी

गॅस्ट्रोच्या रुग्णांची ‘ओपीडी’त गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाºया गॅस्ट्रोच्या रुग्णांची गर्दी आठ दिवसांनंतरही कायम आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीही रुग्णांचा ओघ सुरू आहे. गर्दीमुळे अतिरिक्त वेळ देऊन रुग्णसेवेची जबाबदारी येथील डॉक्टर पार पाडत आहेत.
रुग्णालयात रविवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागात ५० रुग्णांनी उपचार घेतले होते. तर १६ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेनंतरही रुग्णांची गर्दी सुरूच होती. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात ५४ रुग्ण ओपीडीत दाखल झाले. यामध्ये १६ जणांना सलाइन लावण्यात आली. गॅस्ट्रोच्या उपचारासाठी सलाइन लावण्यासाठी रुग्णालयात दाखल होणाºयांची संख्या कमी झाली आहे. परंतु ओपीडीमध्ये जुलाब, पोटदुखी, उलट्या असा त्रास होत असल्याच्या तक्रारी घेऊन येणाºया रुग्णांचे प्रमाण क मी होत नसल्याचे दिसते. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत गॅस्ट्रोचे ४८ रुग्ण आले. यामध्ये ८ रुग्णांना सलाइन लावण्यात आली.
जलवाहिनीच्या कामामुळे छावणी परिसरात महापालिकेच्या टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. गॅस्ट्रोला पूर्णपणे आळा घालण्यासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
टँकरने पाणी
महापालिकेच्या टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. तर दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले पाणी परिषदेमार्फत पुरविण्यात येत असल्याचे छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर म्हणाले.

Web Title:  Gastro patients' OPD rush in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.