औरंगाबाद : आईची तब्येत खराब झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात न्यायचे आहे, अशी थाप मारून ओळखीच्या अल्पवयीन मुलीला (१६) दुचाकीवर बसवून थेट निर्जनस्थळी नेऊन नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ३ आॅगस्ट रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास संग्रामनगर रेल्वेरूळ परिसरात घडली. जवाहरनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
शेरूसिंग गावंडी (२७, रा. गादिया विहार) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडिता हे परिचयाचे आहेत. जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, बालाजीनगर येथे आईसोबत राहणारी १६ वर्षीय तरुणी शनिवारी रात्री ७ वाजता धावणी मोहल्लातील गुरुद्वारात दर्शनासाठी गेली होती. तेथून ती परतत असताना आरोपी शेरूसिंगने मोबाईलवर संपर्क साधून तिच्या आईची प्रकृ ती खराब झाल्याने घाटी रुग्णालयात जायचे आहे. मी तुला घ्यायला येतो, तू तयार राहा, असे सांगितले. त्याच्या सांगण्यावरून पीडिता गुरुद्वारासमोर उभी राहिली. आरोपी मोटारसायकलने तेथे आला. त्याच्या दुचाकीवर बसून ती घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ एक मित्र येणार असून त्याच्याकडून पैसे घेऊन जाऊ, असे तो तिला म्हणाला. यानंतर तो तिला घेऊन संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळील रेल्वेरूळाजवळ अंधारात दुचाकी थांबविली. तेथे दुचाकी उभी केल्यानंतर त्याचा कोणताही मित्र तेथे आला नाही. उलट त्याने पीडितेसोबत बळजबरी करण्यास सुरुवात केली. तो तिला बळजबरीने पुढे अंधारात ओढत एका झाडाखाली घेऊन गेला. आईकडे जायचे आहे, माझे दुसºया मुलासोबत प्रेम आहे, मला सोडून दे, अशी हात जोडून विनंती पीडिता त्याच्याकडे करीत होती. मात्र, तिचे काहीही न ऐकता तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेनंतर तो तिला घेऊन तेथील एका बीअर शॉपीपर्यंत आला. तिला तेथेच सोडून दिल्यानंतर तो दुचाकीवर बसून तेथून पसार झाला.
रिक्षाने घर गाठले...या अत्याचारामुळे मानसिक आणि शारीरिक धक्क्यातच असताना तिने कशीबशी रिक्षा भाड्याने घेऊन घर गाठले. आई आणि मामाला घटनेची माहिती दिल्यानंतर ते तिला घेऊन जवाहरनगर ठाण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे यांनी फिर्याद नोंदवून घेतली आणि अवघ्या काही तासांत आरोपी शेरूसिंगला बेड्या ठोकल्या.
धार्मिक पोथी वाचननराधम शेरूसिंग हा शहरातील एका प्रार्थनास्थळी धार्मिक ग्रंथ वाचतो. दिवसातील १२ ते १५ तास तो प्रार्थनास्थळी असतो. तरीही त्याने अल्पवयीनमुलीवर अत्याचार केल्याने पोलीस व नागरिकांनी संताप व्यक्त केला.
६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीआरोपी शेरूसिंगला रात्री बेड्या ठोकल्यानंतर रविवारी दुपारी पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार न्यायालयाने शेरूसिंगला ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.