गुडईअर, इंडो जर्मन टूल रूम, ए.आय.टी.जी. संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:17 AM2019-03-17T00:17:13+5:302019-03-17T00:19:07+5:30

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुडईअरने बांधकाम विभाग ब संघावर, इंडो जर्मन टूल रूमने एमआयटीवर, तर ए.आय.टी.जी.ने एशियनवर मात केली. आज झालेल्या सामन्यात इंद्रजित उढाण, मधुकर इंगोले व हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

Goodyear, Indo German Tool Room, AITG Team won | गुडईअर, इंडो जर्मन टूल रूम, ए.आय.टी.जी. संघ विजयी

गुडईअर, इंडो जर्मन टूल रूम, ए.आय.टी.जी. संघ विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुडईअरने बांधकाम विभाग ब संघावर, इंडो जर्मन टूल रूमने एमआयटीवर, तर ए.आय.टी.जी.ने एशियनवर मात केली. आज झालेल्या सामन्यात इंद्रजित उढाण, मधुकर इंगोले व हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
पहिल्या सामन्यात ए.आय.टी.जी.ने ५ बाद १५७ धावा केल्या. त्यांच्याकडून मयंक विजयवर्गीयने ४८, दशवीरसिंह व संकेत पाटील यांनी प्रत्येकी २६ धावा केल्या. दीपक भुजंगे, इरफान पठाण, आशिष लाव्हे व हर्षवर्धन त्रिभुवन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एशियन हॉस्पिटल संघ ६५ धावांत गारद झाला. ए.आय.टी.जी.कडून मधुकर इंगोलेने १६ धावांत ६ व संकेत पाटीलने २ गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात बांधकाम विभाग ब ने ७ बाद १३७ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून अबुबकर पटेलने ३१, युसूफ शेखने ३१ व सय्यद नूर उल हकने २१ धावा केल्या. गुडईअरकडून सिराज बेग, गणेश बोटे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. इंद्रजित उढाण, सुनील जाधव व राहुल पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात गुडईअरने विजयी लक्ष्य १६ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून इंद्रजित उढाणने ५५ चेंडूंतच ६ षटकार व ७ चौकारांसह ८९ धावा केल्या. बांधकाम विभाग ब संघाकडून राहुल परदेशीने १ गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात इंडो जर्मन टूल रूमने ८ बाद १३४ धावा केल्या. त्यांच्याकडून हुसेन अमोदीने ७ चौकारांसह ४३, दीपक जगतापने २ षटकार व २ चौकारांसह नाबाद ४० धावा केल्या.
एमआयटी हॉस्पिटलकडून सारंग कांबळेने २६ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमआयटी हॉस्पिटल संघ १२३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून रोहन शहाने ३१ व साई डहाळे याने २० धावा केल्या. इंडो जर्मन टूल रूमकडून हुसेन अमोदी, महेश वझे यांनी प्रत्येकी २, तर सौरभ अडलक याने १ गडी बाद केला.

Web Title: Goodyear, Indo German Tool Room, AITG Team won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.