सरकारी कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:46+5:302021-05-05T04:06:46+5:30
एमजीएमला पाच लाखांचे अर्थसाहाय्य औरंगाबाद : इंड्रेस हाऊजर या कंपनीने एमजीएमला पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य कोरोना उपाययोजनांसाठी केले ...
एमजीएमला पाच लाखांचे अर्थसाहाय्य
औरंगाबाद : इंड्रेस हाऊजर या कंपनीने एमजीएमला पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य कोरोना उपाययोजनांसाठी केले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास देसाई यांच्याकडून एमजीएमचे सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी मदत स्वीकारली. यावेळी देसाई म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पूर्ण देश सामना करीत आहे. गरीब आणि गरजूंवर उपचार करण्यासाठी पुढाकाराच्या भावनेने ही मदत केली आहे. डॉ. सूर्यवंशी यांनी मदतीबद्दल आभार मानले.
आकाशवाणी चौकात कारचालकांची अडवणूक
औरंगाबाद : आकाशवाणी चौकात पोलिसांकडून शहरातील कारचालकांची अडवणूक करण्यात येत आहे. कारमधून एकट्या जाणाऱ्या नागरिकांना अडवून मास्क नाकाच्या खाली असला तरी ५०० रुपये दंडाची पावती देत आहेत. एकटी व्यक्ती कारमधून जात असल्यास दंड आकारण्यावरून पोलीस आणि कारचालकांत वाद नित्याचे झाले आहे.