धनगर आरक्षण न दिल्यास सरकारचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:05 AM2018-06-01T00:05:09+5:302018-06-01T00:06:57+5:30

मागच्या सरकारने धनगरांना आरक्षण दिले नाही. त्या सरकारची माती झाली. आता हेही सरकार धनगरांना आरक्षण देत नाही. विलंब करीत आहे. या सरकारचेही काय करायचे हे लवकरच दिसेल... मागच्या तीन महिन्यांपासून जय मल्हार सेना याची तयारी करीत आहे, असा स्पष्ट इशारा यानिमित्ताने सेनेचे प्रमुख लहुजी शेवाळे यांनी दिला.

Government opposes if no reservation is given | धनगर आरक्षण न दिल्यास सरकारचा विरोध

धनगर आरक्षण न दिल्यास सरकारचा विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादेत इशारा : अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणुकीनिमित्त आरक्षणाचा मुद्दा ठरला महत्त्वाचा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. ती साजरी करीत असतानाच धनगर आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. धनगर समाजाच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा. मागच्या सरकारने धनगरांना आरक्षण दिले नाही. त्या सरकारची माती झाली. आता हेही सरकार धनगरांना आरक्षण देत नाही. विलंब करीत आहे. या सरकारचेही काय करायचे हे लवकरच दिसेल... मागच्या तीन महिन्यांपासून जय मल्हार सेना याची तयारी करीत आहे, असा स्पष्ट इशारा यानिमित्ताने सेनेचे प्रमुख लहुजी शेवाळे यांनी दिला.
पैठणगेटपासून निघालेल्या अहिल्यादेवी होळकर जयंती मिरवणुकीचा समारोप रात्री कोकणवाडी येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी आमदार संजय शिरसाट, मनपा सभागृह नेते विकास जैन व माजी सहकार संचालक डॉ. सुभाष माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरवणुकीतील डफ स्पर्धेची बक्षिसेही या पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. गंगापूर तालुक्यातील मांजरीच्या डफ संघास व फुलंब्री तालुक्यातील आडगावच्या संघास ही रोख बक्षिसे देण्यात आली. या दोन संघांनी बक्षीस स्वीकारण्यापूर्वी आपला परफॉर्मन्स दाखवला व येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात त्यांना उपस्थितांनी प्रतिसाद दिला.
मीराबाई सोनवणे, चंद्रशेखर गायके, विठ्ठलराव सोनवणे, रंजना बोरसे, गयाबाई साबळे, विनोद सोनवणे, बंटी सोनवणे, धुराजी तांबे, उत्सव समितीचे यंदाचे अध्यक्ष तुळशीदास खटके, दत्ता मेहत्रे, अभिषेक कोरे आदींची उपस्थिती होती.
आरक्षण मिळवून घ्या...
आ. संजय शिरसाट यांनी भाषण करताना धनगर समाजाला सल्ला दिला की, आरक्षण मिळवून घ्या. हा धागा पकडून शेवाळे यांनी या सरकारलाही पुढील परिणामांचा इशारा दिला व शिरसाट यांच्या खांद्यावरच बंदूक ठेवून आम्हाला आरक्षण घ्यायचे आहे, असे सूचित केले. राज्यकर्त्यांनी सामान्य माणसांची दखल कशी घ्यायची याचा आदर्श अहिल्यादेवी होळकर यांच्यापासून घ्यावा, असा सल्ला डॉ. सुभाष माने यांनी यावेळी दिला.

Web Title: Government opposes if no reservation is given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.