पारोच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:03 AM2021-05-24T04:03:21+5:302021-05-24T04:03:21+5:30

सिल्लोड : पारोच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ येथील ईगल ग्लोबल फाऊंडेशन आणि अजिंठा येथील स्थानिक ग्रामपंचायत व इतिहास प्रेमींनी पारोच्या ...

Greetings on the occasion of Paro's Memorial Day | पारोच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पारोच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

googlenewsNext

सिल्लोड : पारोच्या स्मृतिदिनानिमित्त भुसावळ येथील ईगल ग्लोबल फाऊंडेशन आणि अजिंठा येथील स्थानिक ग्रामपंचायत व इतिहास प्रेमींनी पारोच्या स्मृतिदिनानिमित्त त्याठिकाणी जाऊन कबरीची साफसफाई करुन अभिवादन केले.

अजिंठ्यात असणाऱ्या पारोची कबर या ऐतिहासिक वारसा स्थळाची अत्यंत दुरवस्था झाली असून आजच्या या समृद्ध इतिहासात पारो अडगळीत पडली असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन कबरीची साफसफाई करण्यात आली.

रविवारी सकाळी साफसफाई करून नंतर कबरीजवळ दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शंकराचार्य स्वामी, मंगेश भागवत, ईगल ग्लोबल फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा निसर्गप्रेमी विलास घनश्याम महाजन, सचिव सुनीता बोरसे, स्थानिक इतिहास संशोधक विजय पगारे, ग्रा.पं. सदस्य ईश्वर माहोर, आजम खान, डॉ. गणेश दसरे, शिवा झलवार, संजय माहोर, दिलीप झलवार, गोपाल माहोर, दीपक चव्हाण, सचिन पाठे हजर होते. पारोची समाधी हा एक ऐतिहासिक वारसा असून ग्रामपंचायतीच्या वतीने या स्थळाचे सुशोभिकरण करुन येथे उद्यान बनविण्याचा प्रयत्न करु. असे ग्रा.पं.सदस्य ईश्वर माहोर यांनी सांगितले.

फोटो : पारोच्या स्मृतिस्थळी अभिवादन करताना मान्यवर.

230521\img-20210523-wa0285.jpg

पारोच्या स्मृतिस्थळी अभिवादन करताना मान्यवर.

Web Title: Greetings on the occasion of Paro's Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.