सीएमुळेच जीएसटीची अंमलबजावणी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:30 AM2017-09-29T00:30:47+5:302017-09-29T00:30:47+5:30

सीएमुळेच जीएसटीची अंमलबजावणी शक्य झाली, असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी येथे व्यक्त केले.

GST can be implemented due to CA | सीएमुळेच जीएसटीची अंमलबजावणी शक्य

सीएमुळेच जीएसटीची अंमलबजावणी शक्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बोटावर मोजण्याइतकेच चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) चुकीचे काम करतात. मात्र, त्यामुळे सर्व सीएला टार्गेट केले जाते. देशातील बहुतांश सीए प्रामाणिकपणे आपले कार्य करीत आहेत. जीएसटीची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सीए प्रचंड मेहनत घेत आहेत. दिवस-रात्र एक करून काम करीत आहेत. मात्र, ही बाजू सर्वांसमोर येतच नाही. सीएमुळेच जीएसटीची अंमलबजावणी शक्य झाली, असे प्रतिपादन इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाचे (आयसीएआय) राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी येथे व्यक्त केले.
सीए संघटनेच्या स्थानिक शाखेच्या वतीने बुधवारी आयोजित कार्यशाळेत ते सीएंना मार्गदर्शन करीत होते. सातारा परिसरातील आयसीएआय भवनसमोर सीए विकमसे यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर अद्ययावत वाचन कक्षाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी, व्यासपीठावर आयसीएआयच्या बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष सीए मंगेश किनारे, केंद्रीय समितीचे सदस्य सीए प्रफुल्ल छाजेड, सीए अनिल भंडारी, सीए उमेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावका यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. विकमसे पुढे म्हणाले की, जीएसटी ही मोठी करप्रणाली सर्वोत्तम आहे. नवीन करप्रणाली असल्याने सर्वांना काम करताना अवघड जात आहे. अनेक समस्या येत आहेत. यात बहुतांश तांत्रिक समस्या आहेत. मात्र, भविष्यात जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. उद्या नवी दिल्लीत आयोजित बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना जीएसटीत येणाºया अडचणीची माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. सरकार सीएला टार्गेट करीत असते. जीएसटी यशस्वी करण्यासाठी सीए घेत असलेल्या मेहनतीची कोणी दखल घेत नाही. संघटनेने शासनाकडे बाजू भक्कमपणे मांडावी, असे आवाहन अल्केश रावका यांनी केले. संघटनेचे सीए सचिन लाठी, गणेश शिलावंत, रेणुका देशपांडे, पंकज सोनी, सीए विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रोहन अचलिया, योगेश अग्रवाल, रवींद्र शिंदे आदी पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.

Web Title: GST can be implemented due to CA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.