कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेत केला मेहुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 07:19 PM2021-07-31T19:19:39+5:302021-07-31T19:22:09+5:30

पत्नी गरोदर असल्यामुळे हर्सुल परिसरातील माहेरी बाळंतपणासाठी आली होती.

He raped his sister-in-law under the pretext of leaving the company | कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेत केला मेहुणीवर अत्याचार

कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेत केला मेहुणीवर अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देपोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल सख्खा दाजी अटकेत, तीन दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद : वाळुज येथील कंपनीत नोकरीत असलेल्या अल्पवयीन मेहुणीला नोकरीच्या ठिकाणी सोडतो असे सांगून बहिणीच्या नवऱ्याने मोटरसायकलवर सोबत घेतले. वाळूजकडे जात असतानाच तिसगाव परिसरातील एका लॉजमध्ये मेहुणीला नेत अत्याचार केल्याची घटना २९ जुलै रोजी घडली आहे. या प्रकरणी सख्या दाजीवर पोस्को कायद्यातंर्गत बलात्काराचा गुन्हा हर्सुल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्सुल परिसरातील एका मुलीचा विवाह तिसगाव परिसरातील २२ वर्षीय युवकासोबत झाला होता. त्याची पत्नी गरोदर असल्यामुळे हर्सुल परिसरातील माहेरी बाळंतपणासाठी आली होती. तीला भेटण्यासाठी नवरा २९ जुलै रोजी सकाळी घरी आला. पत्नीला भेटल्यानंतर वाळूज येथील एका कंपनीत नोकरीला असलेल्या १७ वर्षीय मेहुणीला नोकरीच्या ठिकाणी सोडतो असे सांगून घेऊन गेला. मेहुणीला तीसगाव परिसरातील एका लॉजवर घेऊन जात अत्याचार केले. अत्याचार केल्यावर मेहुणीला कंपनीच्या दारात नेऊन सोडत दाजी पसार झाला. मात्र संबंधित मुलीला उशिर झाल्यामुळे कंपनी प्रशासनाने आतमध्ये घेतले नाही.

या मुलीकडे मोबाईल नसल्यामुळे चालत एका चौकात आली. त्याठिकाणाहुन एका व्यक्तीच्या मोबाईलवरून दाजीला घरी सोडण्याची विनंती केली. मात्र त्याने सोडण्यासाठी येण्यास नकार दिला. यानंतर पिडित मुलगी एका व्यक्तीच्या सोबतच घरी परतली. त्यानंतर घडलेला वृत्तांत घरी सांगितल्यानंतर हर्सुल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या तक्रारीनुसार सख्खा दाजी असलेल्या व्यक्तीवर पोस्को कायद्यातंर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ करीत आहेत.

आरोपीला पोलीस कोठडी
अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला हर्सुल पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: He raped his sister-in-law under the pretext of leaving the company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.