रुग्णालयातील रिक्त पदे कशी भरणार? शपथपत्र द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:57+5:302021-05-05T04:06:57+5:30

-रुग्णालयातील रिक्त पदे व वैद्यकीय सुविधांचा अभाव; खासदार जलील यांची जनहित याचिका औरंगाबाद : कोरोनावर उपचार करणाऱ्या सरकारी रुग्णालयातील ...

How to fill the vacancies in the hospital? Give an affidavit | रुग्णालयातील रिक्त पदे कशी भरणार? शपथपत्र द्या

रुग्णालयातील रिक्त पदे कशी भरणार? शपथपत्र द्या

googlenewsNext

-रुग्णालयातील रिक्त पदे व वैद्यकीय सुविधांचा अभाव; खासदार जलील यांची जनहित याचिका

औरंगाबाद : कोरोनावर उपचार करणाऱ्या सरकारी रुग्णालयातील रिक्त पदे कशी भरणार आणि वैद्यकीय सोयी-सुविधा कशा उभारणार, याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने केंद्र व राज्य शासनाला दिले आहेत. याचिकेची पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.

कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे व आरोग्य सुविधांच्या अभावासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्तिशः (पार्टी इन पर्सन) दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी (दि.४ ) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘ऑनलाइन’ सुनावणी झाली. न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस.डी. यांनी केंद्र आणि राज्य शासनाला नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयी-सुविधांचा अभाव यासंदर्भात खासदार जलील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. कोरोनाच्या सर्व रुग्णांचा महात्मा गांधी जनआरोग्य योजनेत समावेश करावा, अशी विनंती खा. जलील यांनी याचिकेत केली आहे.

खासदार जलील यांनी त्यांची बाजू स्वतः मांडली, तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे काम पाहत आहेत.

Web Title: How to fill the vacancies in the hospital? Give an affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.