पाझर तलावातून अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 07:52 PM2018-10-28T19:52:53+5:302018-10-28T19:56:24+5:30
वाळूज महानगर: तीसगाव पाझर तलावातून वाळू माफिया अवैधपणे वाळूचा उपसा करील असल्याचे उघडकीस येत आहे. वाळूच्या नावाखाली माती मिश्रित वाळू विकून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे महसूल प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वाळूज महानगर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने सध्या वाळूला भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करुन वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया विविध ठिकाणांहून अवैधपणे माती मिश्रित वाळूचा उपसा करीत आहेत.
लांझी, धामोरी, विटावा आदी ठिकाणासह आता तीसगावच्या पाझर तलावातूनही मोठ्या प्रमाणात मातीमिश्रित वाळूचा उपसा केला जात आहे. वाळूचा तुटवडा असल्याने वाळू माफियाकडून तलावातून माती मिश्रित वाळू आणून खामनदी, सिडको परिसरात अर्धवट धुवून तिच वाळू नागरिकांना चढ्या भावाने विकली जात आहे.
वाळूज महानगरात रात्रंदिवस हायवा अवैध वाळूची वाहतूक करीत आहेत. अनेकदा या वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडल्याने या वाहनांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे. या विषयी तहसीलदार रमेश मुनलोड म्हणाले की, पाहणी करुन अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई केली जाईल.
महसूल विभागाचे पथक नावालाच ..
शासनाचा महसूल बुडवून अवैध गौण खनिजाची चोरी करणाºयावर कायदेशीर कारवाई करण्यसाठी प्रशासनाने महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. वाळूज महानगर परिसरात अनेक दिवसांपासून वाळू व मुरुमाची अवैधरित्या चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नसल्याने महसूल विभागाची पथके नावालाच आहेत की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.