औरंगाबाद : डॉ.आकांक्षा देशमुख खून प्रकरणाने विद्यार्थिनींच्या वसतिगृहांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलावीत, यासाठी विद्यापीठ विकास मंचतर्फे प्रकुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले.
एमजीएम संस्थेच्या वसतिगृहात झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि पालकांच्या मनात वसतिगृहांतील मुलींच्या राहण्याविषयी असलेली चिंता दूर करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहेत. यात वसतिगृहात पुरेसे सुरक्षा कर्मचारी नेमणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे, वसतिगृहे आणि परिसरात पुरेसे दिवे लावणे, वसतिगृह परिसरात येणाºया प्रत्येक अभ्यागतांची नोंद व चौकशी करणे, सुरक्षारक्षकांच्या वशिल्याने काही विद्यार्थी, विद्यार्थिनी वेळी-अवेळी वसतिगृहात येतात. त्याला पायबंद घालणे, वसतिगृह अधीक्षिका वसतिगृहात किंवा विद्यापीठ परिसरात राहणाºया असाव्यात, विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व मूलभूत गरजा या वसतिगृह परिसरातच पूर्ण होण्यासाठीची व्यवस्था निर्माण करावी, वसतिगृहात बाहेरून येणाºया डब्बेवाल्यांची संपूर्ण माहितीची नोंद ठेवावी, त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक प्रा.गजानन सानप, अधिसभा सदस्या डॉ. योगिता तौर-होके पाटील, नरहरी शिवपुरे, डॉ. महानंदा दळवी, डॉ.दया पाटील यांच्या स्वाक्षºया आहेत.------------