औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे मनुष्यबळ १७०० च्या आसपास आहे. ग्रामीण हद्दीत २३ पोलीस ठाणी आहेत. या वर्षी शहरापेक्षा अधिक झपाट्याने ग्रामीण भागात कोरोनाची साथ पसरली. महामारी आटोक्यात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्रंदिवस रस्त्यावर नाकाबंदी करते आहे. विनामास्क नागरिकांवर कारवाई करणे आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यावर गुन्हे नोंदविण्याचे काम पोलीस करीत आहेत. बऱ्याचदा काम करताना कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी बाधित होत असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील २० अधिकारी आणि १३६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. यापैकी एक अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला होता. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पोलिसांना सतत सूचना केल्या. प्रत्येक ठाण्याला सॅनिटायझर, मास्क आणि फेसशिल्ड पुरविले. यासोबतच खबरदारीचे अनेक उपाय सुचविले. त्याचे चांगले परिणाम दुसऱ्या लाटेत दिसू लागले आहेत. पोलीस स्वतः काळजी घेतात, स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम, सकस आहारास प्राधान्य देत आहेत. शिवाय मास्क, स्वच्छता आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करीत असल्याचा हा परिणाम असल्याचे पोलीस सांगतात.
=============
कोट
रोज सकाळी नियमित व्यायाम
धकाधकीच्या जीवनात रोज सकाळी विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडीची चढाई करणे आणि उतरणे करतो. सकस आहार घेणे आणि मास्क घालणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखून काम करतो. सकारात्मक विचारसरणीने आम्ही आतापर्यंत कोरोनाला दूर ठेवले.
- सुरेश वाघचौरे, पोलीस कॉन्स्टेबल,
=====================
व्यायाम, योगा व प्राणायामासोबत सकस आहारामुळे फायदा
कोविड संसर्गाच्या कालावधीत गुन्हे शाखेत काम करताना थेट आरोपींशी संपर्क येतो. अशावेळी आपल्याला संसर्ग होणार नाही, यासाठी मास्क घालणे आणि सोबत सॅनिटायझर अथवा साबणाने हात तातडीने धुणे याकडे लक्ष देतो. सकस आहारासोबत आणि नियमित व्यायाम, योगासने यामुळे कोरोनाला दूर ठेवता आले.
= मुक्तेश्वर लाड, पोलीस कॉन्स्टेबल.
===================
घरातच जीम बनवले
कोविड संसर्गामुळे गतवर्षीपासून व्यायामशाळा आणि जीम क्लब बंद आहेत. व्यायामात खंड पडू नये म्हणून घरातच जीम बनवले. याशिवाय काम करताना संसर्ग होण्याचा धोका असतो. मात्र डबल मास्क वापरत असल्यामुळे कोरोना संसर्ग झाला नाही.
- कल्याण शेळके, फौजदार.
======================
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दल
पहिल्या लाटेत
कोरोनाबाधित पोलीस कॉन्स्टेबल रुग्ण - १५४
बाधित पोलीस अधिकारी - २०
मृत्यू अधिकारी - ०१
मृत्यू पोलीस कर्मचारी - ०१
=================
दुसरी लाट
बाधित पोलीस कर्मचारी - १३६
बाधित अधिकारी - १३
मृत्यू कर्मचारी - ०१
मृत्यू अधिकारी - 00
=================
(एसपी मॅडमचा - कोट देत आहे.)