औरंगाबादेत टपाल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:29 AM2018-05-24T00:29:28+5:302018-05-24T00:30:58+5:30
डॉ.कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासंबंधी सरकार व डाक विभागाकडून हेतुपुरस्सर उशीर करण्यात येत आहे. त्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी टपाल कर्मचा-यांनी संप पुकारला असून, मंगळवारी व बुधवारी टपाल कर्मचा-यांंनी जुना बाजार मुख्य टपाल कार्यालयासमोर निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ.कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासंबंधी सरकार व डाक विभागाकडून हेतुपुरस्सर उशीर करण्यात येत आहे. त्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी टपाल कर्मचा-यांनी संप पुकारला असून, मंगळवारी व बुधवारी टपाल कर्मचा-यांंनी जुना बाजार मुख्य टपाल कार्यालयासमोर निदर्शने केली.
जीडीएस कमिटीच्या शिफारशी नोव्हेंबर २०१६ मध्येच डाक विभागाकडे सादर केल्या होत्या, त्या लागू कराव्यात म्हणून मोर्चे, निदर्शने आंदोलने केली आहेत. पंतप्रधान निवासस्थानावर ऐतिहासिक धरणे केली.
२ एप्रिल २०१८ ला मंत्रालयाने मंजुरी देऊन शिफारशीची फाईल कॅबिनेटकडे पाठविली. सरकार निर्णय घेण्यास वेळ घालवीत आहे. औरंगाबाद विभागातील ग्रामीण डाक सेवकांनी विविध मागणीवर निदर्शने केली.
यावेळी देवेंद्र परदेशी, शालिनी पवार, अण्णा बुजाडे, वैजीनाथ शहाणे, अण्णा दराडे, पी. के. गोल्हार, एस. व्ही. गोरे, के. एस. डोंगरे, सर्फराज तडवी, शेख यकीन, रामदास काटकर, अशोक नवले, किशोर सोनवणे, राजेंद्र काकडे, मोहन डमाळे, ए. एस. अतार, रघुवीर ठाकूर, विशाल वेताळ, बी. टी.भवर, हिरा मुरदारे, अंजली जोशी, कविता गवारे, प्रियंका भवरे, सुनीता गंगासागरे आदींची उपस्थिती होती.