जायकवाडी धरणात आवक वाढली; जलसाठा ३८.३५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 07:26 PM2021-07-31T19:26:43+5:302021-07-31T19:29:51+5:30

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर,दारणा व भावली या धरणात  प्रचलन आराखड्या नुसार जितका जलसाठा ठेवता येतो त्यापेक्षा जास्त जलसाठा झाल्याने या धरणातून शुक्रवारी सायंकाळी विसर्ग करण्यात आला.

Inflow to Jayakwadi Dam increased; Water storage at 38.35 per cent | जायकवाडी धरणात आवक वाढली; जलसाठा ३८.३५ टक्क्यांवर

जायकवाडी धरणात आवक वाढली; जलसाठा ३८.३५ टक्क्यांवर

googlenewsNext
ठळक मुद्देएकत्रितपणे नांदूर मधमे्श्वर वेअर मधून गोदावरी पात्रात ९६६७ क्युसेक्स क्षमतेने विसर्गगोदावरी नदी वहाती झाली असून शनिवारी पहाटे हे पाणी जायकवाडी धरणात येऊन धडकले.

- संजय जाधव

पैठण : जायकवाडी धरणात शनिवारी पहाटे नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी दाखल झाले. ७६७२ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक नाथसागरात सुरू असून जलसाठा ३८.३५% इतका झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचे यंदा प्रथमच आगमन झाल्याने जायकवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील ज्या धरणात प्रचलन आराखड्यापेक्षा जास्त जलसाठा झाला अशा धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात नाशिकच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे असे दगडी धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, ईगतपुरी व घोटी वगळता ईतर ठिकाणी  सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासातही नाशिक जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली नाही. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर,दारणा व भावली या धरणात  प्रचलन आराखड्या नुसार जितका जलसाठा ठेवता येतो त्यापेक्षा जास्त जलसाठा झाल्याने या धरणातून शुक्रवारी सायंकाळी विसर्ग करण्यात आले. शनिवारी सकाळी गंगापूर २०९० क्युसेक्स, दारणा ५५४० क्युसेक्स, भावली २०८ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. या विसर्गाचा एकत्रितपणे नांदूर मधमे्श्वर वेअर मधून गोदावरी पात्रात ९६६७ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरी नदी वहाती झाली असून शनिवारी पहाटे हे पाणी जायकवाडी धरणात येऊन धडकले. शनिवारी सायंकाळी जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५०८.३६ फुट ईतकी होती. धरणात एकूण जलसाठा १५७०.४४८ दलघमी ( ५५.४६ टीएमसी) झाला असून या पैकी उपयुक्त जलसाठा ८३२.६४२ दलघमी (२९.४० टिएमसी) ईतका झाला आहे. दि  १ जून, २०२१ पासून नाथसागराच्या जलसाठ्यात १९४.१०९७ दलघमी ( ६.८ टीएमसी) वाढ नोंदवली गेली असल्याचे धरण अभियंता विजय काकडे, बंडू अंधारे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणांचा  जलसाठा
करंजवण २२.१४%, वाघाड ४७.५२%,
ओझरखेड २५.७७%, गंगापूर ७६.९६%, 
गौतमी ५६.१६%, पालखेड ५५.७६%, कश्यपी ४७.८५%, कडवा ६१.०२%, दारणा ७६.३९%, भावली १००%, मुकणे ४९.२१%, नांदूर मधमे्श्वर वेअर ९६.५०%, भंडारदरा ८२.३९%, निळवंडे ४३.७५%, मुळा ५०%, पुणेगाव ७.२४%, तीसगाव ०.५०%, वालदेवी १००%, आढळा ४३.२८%, मंडोहळ ०००%, वाकी ४०.१२%, भाम ७६.४२%, आळंदी ७०.४७%, व भोजापूर १४.९८% ईतका जलसाठा झाला आहे.

सायंकाळी विसर्ग घटविले...
नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने नाथसागरात येणारी आवक घटत असल्याचे दिसून आले शनिवारी सायंकाळी ६ वा गंगापूर धरणातून २०९० होणारा विसर्ग ५२४ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला. दारणातून ५५४० होणारा विसर्ग ३१२० क्युसेक्स व नांदूर मधमे्श्वर मधून गोदावरी पात्रात होणारा ९६६७ विसर्ग ५७७८ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक घटणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे व बंडू अंधारे यांनी सांगितले.

Web Title: Inflow to Jayakwadi Dam increased; Water storage at 38.35 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.