औरंगाबाद : सिडको एन-६ परिसरातील आविष्कार कॉलनीत मागील महिनाभरापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
यासंदर्भात येथील रहिवाशांनी सांगितले की, मागील महिनाभरापासून कॉलनीतील अनेक घरांना कमी दाबाने पाणी येत आहे. यामुळे हौदसुद्धा भरत नाही. परिणामी, खाजगी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. कॉलनीत काही जणांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले आहे.
त्याचाही परिणाम, येथील पाणीपुरवठ्यावर होत आहे. त्यात अनधिकृत नळ कनेक्शनमुळे विद्युत मोटारांची संख्या वाढली व डिपीवर ताण पडून नेमके नळाला पाणी येण्याच्या वेळीस डिपी स्थिीत फ्यूज उडून जातो. विद्युत मोटार बंद पडल्याने यामुळे वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही. वॉर्ड अधिकाऱ्यांनी या परिसरात कमी दाबाने पाणी का येते याचे कारणे,शोधून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.