औरंगाबाद : इंग्रजी शाळाचालक विश्वास चंद्रशेखर सुरडकर (रा. श्रीकृष्णनगर, सिडको एन-९) यांच्या हत्येप्रकरणी शहर गुन्हेशाखेने शिक्षिकेच्या पतीला अटक के ली. या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शनिवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून, तब्बल १५ दिवसांनी या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला यश आले.अज्जू ऊर्फ अजय बिसमिल्ला तडवी (३३,रा. नॅशनल कॉलनी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त म्हणाले की, हिमायत बागेतील बांबूबेटात ३० मार्च रोजी रात्री विश्वास सुरडकर यांची हत्या दोरीने गळा आवळून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीत चार जणांची नावे होती. त्यापैकी राजू दीक्षितला पोलिसांनी अटक करून चौकशी केली. अन्य लोकांचीही चौकशी केली. मात्र, या घटनेशी त्यांचा संबंध दिसत नव्हता. विश्वास यांच्या जवळच्या आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित सुमारे ५० जणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी विश्वास यांचे घर ते घटनास्थळापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या रात्री अज्जू तडवी हा जाताना दिसला. त्यावरून शनिवारी दुपारी पोलिसांनी अज्जूला गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उचलले. चौकशीत त्याने विश्वासची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्या बुटावर रक्ताचे पुसटसे डाग आणि महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला. हा खून करण्याचा उद्देश काय, याबाबत अज्जू सध्या उलटसुलट उत्तरे पोलिसांना देत आहे. न्यायालयाकडून त्याची पोलीस कोठडी घेऊन कसून चौकशी केली जाणार आहे.चौकटअज्जूची पत्नी होती विश्वास यांच्या शाळेवरआरोपी अज्जू हा हडको कॉर्नर येथे खाद्यपदार्थ विक्रीचा गाडा चालवितो. मृत विश्वास सुरडकर यांच्या शाळेवर आरोपी अजयची पत्नी शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र, काही कारणामुळे २०१५ मध्ये त्यांनी नोकरी सोडली होती. तेव्हापासून अज्जू आणि विश्वास यांच्यात चांगली ओळख होती. दोघे सतत परस्परांना भेटत. अज्जूच्या गाड्यावर खाद्यपदार्थ खाण्यासाठी विश्वास जात असे.सुपारी देऊन सुरडकर यांची हत्या?सुपारी देऊन हत्या केली अथवा अन्य कारणासाठीआरोपी अज्जूने हत्येची कबुली दिली असली तरी, सुरडकर यांच्या हत्येचे तो देत असलेले कारण पोलिसांना पटत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार सुरडकर हा आत्महत्या करणार होता आणि त्याच्या सांगण्यावरूनच आपण त्याची हत्या केली. त्याच्या सांगण्यावर पोलीस विश्वास ठेवत नाही. कुणाकडून तरी सुपारी घेऊन अज्जूने ही हत्या केली अथवा या हत्येमागे दुसरे काहीतरी कारण आहे, का याबाबतचा तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.------चौकटयांनी केला तपासपोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाटे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, निरीक्षक राजश्री आडे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, उपनिरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक अफरोज शेख, कर्मचारी सुभाष शेवाळे, गजेंद्र शिंगाणे, संजय धुमाळ, सुधाकर राठोड, समद पठाण, सुरेश काळवणे, रमेश भालेराव, अशरफ सय्यद,भाऊलाल चव्हाण, संदीप बीडकर, नितीन धुळे, ज्ञानेश्वर ठाकूर, नितीन देशमुख, महिला कर्मचारी कुटे यांनी हा तपास करून आरोपीला अटक केली.
संस्थाचालक विश्वास सुरडकर हत्येप्रकरणी शिक्षिकेचा पती अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:39 PM
इंग्रजी शाळाचालक विश्वास चंद्रशेखर सुरडकर (रा. श्रीकृष्णनगर, सिडको एन-९) यांच्या हत्येप्रकरणी शहर गुन्हेशाखेने शिक्षिकेच्या पतीला अटक के ली. या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शनिवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून, तब्बल १५ दिवसांनी या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला यश आले.
ठळक मुद्देगुन्हेशाखेची कामगिरी : पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती: गळा चिरल्याची दिली कबुली, खुनाचे कारण मात्र अस्पष्ट,सीसीटीव्हीचे फुटेज ठरले महत्त्वाचा दुवा