जातवा ग्रा.पं. निवडणुकीत भाजपा विरुद्ध कॉंग्रेस सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:02 AM2021-01-10T04:02:21+5:302021-01-10T04:02:21+5:30
ज्ञानेश्वर चोपडे आळंद : फुलंब्री तालुक्यातील जातवा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉंग्रेस असा सामना रंगला आहे. तीन प्रभागातील नऊ ...
ज्ञानेश्वर चोपडे
आळंद : फुलंब्री तालुक्यातील जातवा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉंग्रेस असा सामना रंगला आहे. तीन प्रभागातील नऊ जागांसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
राज्यभरात होत असलेल्या ग्रामपंचायतचे मतदान १५ जानेवारीला होत आहे. मतदानासाठी अवघे पाच दिवस उरले असून प्रचाराचा वेग वाढला आहे. जातवा ग्रामपंचायत ही नऊ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. तीन विद्यमान सदस्य पुन्हा निवडणुकीत आपले नशीब आजमावीत आहेत. दोन पॉनलमधून अठरा उमेदवार आपले नशीब आजमावीत आहेत. दहा वर्ष सरपंच राहीलेले भाजपाचे तान्हाजी पवार यांच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनल विरूद्ध कॉंग्रेसचेही दहा वर्ष सरपंच राहिलेले गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. १३४४ मतदार असून त्यात ७२६ पुरुष तर ६१८ महिला मतदार आहेत.
विकासकामावर प्रचाराचा जोर
दोन्ही पॅनलचे प्रमुख हे त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा प्रचार करीत आहे. आम्हाला संधी मिळाल्यास येत्या काळात आम्ही काय करणार याबद्दल जाहीरनामा सांगीतला जात आहे. या निवडणुकीत सर्वात तरूण उमेदवार म्हणून मनिषा योगेश रावते. तर सर्वात ज्येष्ढ उमेदवार म्हणून कोंडीबा मैनाजी पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
बाहेरगावी असलेल्या मतदारांच्या भेटिगाठी-
जातवा येथील मतदार यादीत नाव असलेले काही मतदार नोकरी, व्यवसायानिमित्त औरंगाबाद व इतर ठिकाणी राहत असल्याने १५ जानेवारी रोजी होणा-या मतदानासाठी या मतदारांनी यावे या करीता दोन्ही पॅनलकडून आवाहन केले जात आहे.
फोटो ओळ - जातवा (ता.फुलंब्री) येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत.