खांबावरील जम्पर तुटले, दोघे किरकोळ भाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:17 PM2019-04-14T23:17:30+5:302019-04-14T23:17:52+5:30
विद्युत खांबावरील जम्पर तुटल्याने विजेचा दाब वाढुन तीन घरांतील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास सिडकोतील साईनगरात घडली.
वाळूज महानगर : विद्युत खांबावरील जम्पर तुटल्याने विजेचा दाब वाढुन तीन घरांतील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास सिडकोतील साईनगरात घडली. यात घरातील फिटींगच्या पट्या व वायर गरम होऊन अंगावर पडल्यामुळे दोघे किरकोळ भाजले आहेत.
सिडको वाळूजमहानगरात विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य वीजवाहिनीच्या खांबावरील जम्पर तुटल्यामुळे अचानक विजेचा दाब वाढला. यामुळे या परिसरातील घरातील मीटर, वायरिंगला अचानक आग लागली. घरातील पंखे, फ्रिज, कुलर व इतर विद्युत उपकरणे बंद पडली तर घरातील वायरिंगने पेट घेतला. यात विद्या गाढवे या बालंबाल बचावल्या. महेश बाविस्कर यांच्या अंगावर गरम झालेले होल्डर पडल्याने ते किरकोळ भाजले. तसेच स्वाती देशमुख याही किरकोळ भाजल्या आहेत.
या घटनेमुळे घाबरलेल्या साईनगरातील रहिवाशांनी रस्त्यावर आश्रय घेतला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना खांबावरील जम्पर तुटल्याचे दिसून आले. जम्पर तुटल्याने विजेचा दाब वाढून शॉर्टसर्किट होऊन घरातील विद्युत उपकरणे जळाल्याचे विद्युत कर्मचाºयांनी सांगितले. यामुळे सिडको वाळूजमहानगर, वडगाव, तीसगाव आदी भागातील विज पुरवठा खंडीत झाला होता. रात्री ९ वाजेपर्यंत विज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.