चक्क सहा दिवसांनी कळला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाला तपासणी अहवाल; बाधिताला भेटलेल्यांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:51 AM2021-01-28T11:51:00+5:302021-01-28T11:56:24+5:30
corona positive : सहा दिवस सुटीच्या काळात ते ग्रहस्थ मित्र परिवारासह नातेवाईकांना भेटले त्यांना तर संक्रमण झाले नसेल ना अशी चिंता त्यांना सतावू लागली
औरंगाबाद : महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना तपासणी केल्यावर अहवालच न कळवल्याने एक बाधित व्यक्ती सहा दिवस फिरत राहिली. कंपनीत रुजूृ व्हायचं म्हणून व्यक्ती तपासणी केंद्रावर अहवाल घ्यायला गेली तेव्हा तुमचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून तुम्ही भरती व्हा, असे त्या ग्रहस्थाला सांगितल्यावर त्यांना धक्काच बसला. दरम्यानच्या काळात सहा दिवस सुटीच्या काळात ते ग्रहस्थ मित्र परिवारासह नातेवाईकांना भेटले त्यांना तर संक्रमण झाले नसेल ना अशी चिंता त्यांना सतावू लागली, तर संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले असून संक्रमित तर झालो नसेल ना असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
दशमेशनगर परिसरातील एक कंपनीत काम करणारे ग्रहस्थ रेल्वेस्टेशन रोड येथे २१ जानेवारीला कोरोनाच्या तपासणीसाठी गेले. अग्निशमन दल येथील तपासणी केंद्रात संध्याकाळी सातच्या सुमारात त्यांनी आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब दिला. त्यावेळी त्या केंद्रावरील आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी सांगितले. पाॅझिटीव्ह असेल तर नक्की फोन येईल. मात्र, निगेटीव्ह असल्यास फोन शक्यतो येणार नाही. दुसर्या दिवशी ते दिवसभर घरी अलगीकरणात राहीले. मात्र, अहवाल आला नाही. किंवा मनपाकडून कुठलाही निरोप न मिळाल्याने ते बिनधास्थ झाले. दरम्यान ते मित्र, नातेवाईक कुटुंबियांच्या संपर्कात आले. बुधवारी सकाळी त्यांना खोकला यायला लागला. त्यामुळे लक्षणे दिसु लागल्याने त्यांनी तपासणी केली असल्याने रिपोर्ट घेवून डाॅक्टरांकडे जाण्यासाठी घरुन निघाले. मात्र, आरोग्य केंद्रावर त्यांचे नाव तपासल्यावर ते पाॅझीटीव्ह असल्याचे सांगून त्यांना अग्निशमन दलाच्या काॅरंटाईन सेंटर मध्ये भरती केल्या गेले. असे त्या बाधित रुग्णाने सांगितले. तांत्रिक अडचणीत किंवा मनपाचे कर्मचारी अहवाल सांगण्याचे विसरुन गेले असतील. त्यामुळे काही हरकत नसुन इथे आवश्यक सोयीसुविधा असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. मात्र, अगोदर रिपोर्ट कळाला असता तर इतरांच्या संपर्कात जाणे टाळता आले असते असे ते म्हणाले.
बाधिताच्या संपर्कातील चिंतेत
तपासणी केल्याच्या दुसर्या दिवसापासून म्हणजे २३ ते २६ जानेवारी दरम्यान शासकीय दोन सुट्या मिळाल्या होत्या. त्यात कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ज्यांच्या संपर्कात ते बाधित आले. त्यांनी मात्र, कोरोनाचे संक्रमण झाले तर ना या बद्दल भिती व्यक्त केली. सध्या एकीककडे साथ आटोक्यात येत असतांना असे प्रसंग पुन्हा घडू नये यासाठी काळजी घ्यावी व काहीशी ढिली पडलेल्या यंत्रणेला पुन्हा सतर्क करुन गांभिर्य पटवून देण्याची मागणी त्या नातेवाईकांनी केली.