ज्योती गवते, पाराजी गायकवाडने जिंकली गेटगोर्इंग मॅरेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:05 AM2019-02-04T01:05:51+5:302019-02-04T01:06:22+5:30
मराठवाड्याची दिग्गज धावपटू ज्योती गवते आणि परभणीचा पाराजी गायकवाड यांनी गेटगोर्इंगची आठवी रन फॉर हर मॅरेथॉन जिंकली. या दोघांनी अनुक्रमे महिला व पुरुषांच्या १० कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान पटकावले. ही मॅरेथॉन १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतरात झाली. १० किलोमीटरसाठी कलाग्राम एपीआय कॉर्नर, मुकुंदवाडी सिडको उड्डाणपूल ते आकाशवाणी आणि कलाग्राम असा रूट ठरवण्यात आला होता. ५ किलोमीटरसाठी हाच रूट सिडको उड्डाणपुलापासून कलाग्रामपर्यंत वळवण्यात आला होता, तर तीन किलोमीटर स्पर्धा एपीआय कॉर्नर ते कलाग्राम अशी घेण्यात आली.
औरंगाबाद : मराठवाड्याची दिग्गज धावपटू ज्योती गवते आणि परभणीचा पाराजी गायकवाड यांनी गेटगोर्इंगची आठवी रन फॉर हर मॅरेथॉन जिंकली. या दोघांनी अनुक्रमे महिला व पुरुषांच्या १० कि. मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान पटकावले.
ही मॅरेथॉन १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतरात झाली. १० किलोमीटरसाठी कलाग्राम एपीआय कॉर्नर, मुकुंदवाडी सिडको उड्डाणपूल ते आकाशवाणी आणि कलाग्राम असा रूट ठरवण्यात आला होता. ५ किलोमीटरसाठी हाच रूट सिडको उड्डाणपुलापासून कलाग्रामपर्यंत वळवण्यात आला होता, तर तीन किलोमीटर स्पर्धा एपीआय कॉर्नर ते कलाग्राम अशी घेण्यात आली.
मॅरेथॉनचे निकाल (महिला १६ ते ४६ वयोगट - १० कि. मी.) : १. ज्योती गवते, २. माधुरी चेचर, ३. मनीषा दवने. पुरुष : १. पाराजी गायकवाड, २. किरण म्हात्रे, ३. छगन बोंबले. ४० पेक्षा जास्त वयोगट (महिला) : १. सुमित्रा जोशी, २. माधुरी निमजे, ३. प्रिया पाटील.
४५ पेक्षा जास्त वयोगट (पुरुष) : १. विश्वास चौगुले, २. लक्ष्मण शिंदे, ३. अशोक अमाने.
५ कि. मी. (१२ ते ४५ वयेगट पुरुष) : १. आकाश शिंदे, २. सुनील तरटे, ३. नंदकिशोर चाटे. ४५ पेक्षा जास्त वयोगट : १. केशव मोटे, २. राम लिंभारे, ३. सचिन मुंज. १२ ते ४० महिला : १. सुषमा यादव, २. गायत्री गायकवाड, ३. कांचन म्हात्रे, ४० पेक्षा जास्त : १. कल्पना काळे, २. सोनम शर्मा, ३. आभा सिंग.
तत्पूर्वी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डॉ. कानन येळीकर, एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनला सुरुवात झाली. रन फॉर हर हे ब्रीद घेऊन अनेक जोडपी मॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती.
मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी गेटगोर्इंगच्या डॉ. भावना लोहिया, डॉ. सुजाता लाहोटी, डॉ. उमा महाजन, डॉ. संतोष तोतला, डॉ. नीती सोनी , डॉ. प्रिया देशमुख, डॉ. चारुशीला देशमुख, डॉ. संगीता देशपांडे, निना निकाळजे, दीपा डाबरी, डॉ. वंदना मिश्रा, निरुपमा नागोरी, दीप्ती खेमका यांनी प्रयत्न केले.