सोयगावात भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 02:03 PM2019-02-04T14:03:59+5:302019-02-04T14:04:53+5:30

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

land records office Employee's suicide in Soyagaon | सोयगावात भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या 

सोयगावात भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या 

googlenewsNext

सोयगाव (औरंगाबाद ) : उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. चेतनलाल रोतरे (३५ )  असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

चेतनलाल रोतरे हे शहरातील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात निमताणदार या पदावर कार्यरत होते. कार्यालयाच्या चाव्या त्यांच्याकडेच असत. आज सकाळी कार्यालयाची वेळ झाली असतानाही ते उघडण्यात आले नव्हते. यामुळे येथील कर्मचारी रोतरे यांच्या घरी गेले. यावेळी रोतरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून त्यांनी प्रेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले. 

Web Title: land records office Employee's suicide in Soyagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.