रांजणगावात लक्ष्मीमाता यात्रोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:52 PM2019-04-15T23:52:20+5:302019-04-15T23:52:30+5:30
रांजणगाव शेणपुंजी येथील दोन दिवसीय लक्ष्मीमाता यात्रोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला.
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील दोन दिवसीय लक्ष्मीमाता यात्रोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थिती बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पाडला.
रांजणगावात लक्ष्मीमाता उत्सवाला दोन शतकांची परंपरा आहे. मनोकामना पूर्ण करणारी देवता, अशी लक्ष्मीमातेची अख्यायिका आहे. लक्ष्मीमाता मंदिरात सोमवारी पहाटे पूजा करुन यात्रोत्सवास प्रारंभ झाला. मंदिरात मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. सावता माता मंदिरापासून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढोल-ताशाच्या गजरात बारा बैलगाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
मंदिरात मंगळवारी हजेरीचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ५ वाजता कुस्त्याची दंगल होणार आहे. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी आयोजक गोरखनाथ हिवाळे, गोरखनाथ सोनवणे, साहेबराव गवळी, छगन जाधव, सुभाष गोरे, दत्तु हिवाळे, सुभाष सोनवणे, जनार्धन सवई, दीपक सदावर्ते, प्रभाकर महालकर, पंकज हिवाळे आदी परिश्रम घेत आहेत.