गल्ले बोरगांव : तरुण पिढीने वाहतुकीच्या नियमाविषयी जागृत होण्याची गरज असून पालकांनीही मुलांमध्ये वाहतूक नियमाविषयी जनजागृती करावी. १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांच्या हातात दुचाकी, चारचाकी वाहने देऊ नयेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक नंदिनी चानपूरकर यांनी केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघाताचे प्रमाण व अपघाती मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीच्या नियमाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान राज्यभर सुरक्षा जनजागृती केली जात आहे. महामार्ग पोलीस केंद्र आलापूर फाटा, गल्ले बोरगांव येथे याचा शुभारंभ झाला. यावेळी आलापूरचे पोलीस पाटील शैलेश बैनाडे, पळसगाव पोलीस पाटील मनोहर भोसले, शरद दळवी, शांताराम सोनवणे आदींची उपस्थिती होती.
फोटो कँप्शन :
गल्ले बोरगांव : अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर माहिती देताना पो. नि. नंदिनी चानपूरकर व सपोनि सुरेश भाले.