गरिबांची जीवनदायिनी! घाटी रुग्णालयात तब्बल १२०० खाटा; संख्या ऐकून केंद्रीयमंत्री झाले थक्क
By संतोष हिरेमठ | Published: September 30, 2022 12:59 PM2022-09-30T12:59:36+5:302022-09-30T13:01:05+5:30
आज सकाळी घाटी रुग्णालयातील केंद्रीय श्रम, वने, रोजगार तथा पर्यावरण, जलवायूमंत्री भूपेंद्र सिंग यादव यांनी पाहणी केली.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील खाटांची संख्या एकूण केंदीयमंत्री भूपेंद्र सिंग यादव हे थक्क झाले. किती खाटा, अशी विचारणा त्यांनी केली. तेव्हा १२०० खाटा, अशी माहिती त्यांना देताच क्षणभर ते स्तब्ध झाले.
केंद्रीय श्रम, वने, रोजगार तथा पर्यावरण, जलवायूमंत्री भूपेंद्र सिंग यादव औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी घाटी रुग्णालयातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राला भेट देत पाहणी केली. यावेळी घाटी रुग्णालयात तब्बल १२०० खाटा असल्याचे सांगण्यात येताच मंत्री यादव थक्क झाले. त्यानंतर घाटी रुग्णालयातील सोयीसुविधांची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आ. प्रशांत बंब, संजय केनेकर, अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर , वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, डॉ. भारत सोनवणे, डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. विकास राठोड, शाखा अभियंता संध्या मेने, उपविभागीय अभियंता के.एम. आय. सय्यद, मुकुंद फुलारे, राम बुधवंत आदी उपस्थित होते.