‘प्रसादा’वर राहणार करडी नजर

By Admin | Published: August 29, 2014 11:50 PM2014-08-29T23:50:42+5:302014-08-30T00:01:27+5:30

नांदेड :प्रसाद बनविणे आणि त्याची विक्री करणे या सर्व प्रक्रियेवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर राहणार आहे़

Look at the 'Prasada' | ‘प्रसादा’वर राहणार करडी नजर

‘प्रसादा’वर राहणार करडी नजर

googlenewsNext

नांदेड : सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन, वितरण करणारे व्यावसायिक यांनी प्रसादाचा कच्चा माल, त्यापासून प्रसाद बनविणे आणि त्याची विक्री करणे या सर्व प्रक्रियेवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर राहणार आहे़
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणारा खवा तसेच दुग्धजन्य पदार्थ यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे़ अन्नसुरक्षा व मानके (अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणी) नियमन २०११ नियम २़१ अन्वये सर्व अन्न व्यावसायिकांना परवाना अथवा नोंदणी अनिवार्य आहे़ तसेच परिशिष्ट ४ भाग व्ही मधील पोटभाग भाग ई नुसार धार्मिक ठिकाणातील अन्नविषयी सेवाचा समाविष्ट होत असल्यामुळे नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे़
प्रसाद करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी़ प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा़ भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी़ फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवाना नोंदणी धारकाकडून करावी़ कच्चे, सडलेल्यार किंवा खराब फळांचा वापर करू नये़ प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील याची खात्री करावी़ आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी़ प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य, पोषक असावे़ प्रसाद उत्पादन करणाऱ्या स्वयंसेवकास अ‍ॅप्रन, ग्लोव्हज, टोपी (हेड गिअर) आदी देण्यात यावे़ प्रत्येक वेळी स्वयंसेवकाने हात धुवावेत़ प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याची संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी़ प्रसादामध्ये खवा, मवा याचा वापर होत असल्यास अतिदक्षता घेण्यात यावी़ दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील, असे विशेषत: ४ अंश सेल्सिअस अथवा कमी तापमानावरच साठवणुकीस ठेवावेत़ खवा, माव्याची वाहतूक व साठवणूक थंड, रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी़ जुना, शिळा अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठविलेला मावा प्रसादासाठी वापरू नये़ प्रसाद बनविणाऱ्या मंडळांनी प्रसादाच्या कच्चा मालाचे खरेदी बिल, प्रसाद बनविणाऱ्या केटरर, स्वयंसेवक यांची संपूर्ण माहिती, प्रसाद वितरण करणाऱ्या स्वयंसेवकांची संपूर्ण माहिती इत्यादीचा अभिलेख भरून अद्ययावत करून ठेवावा़ तपासणी करण्यासाठी अन्नसुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे व त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील़ (प्रतिनिधी)
अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्याअंतर्गत नियम व नियमन २०११ मधील तरतुदींचे प्रसाद विके्रते, बनविणारे आणि वितरकांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पी़ डी़ गळाकाटू यांनी केले़

Web Title: Look at the 'Prasada'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.