दाम दुप्पटीच्या लालसेने केला घात; अद्रक व्यापाऱ्याची ४ लाखाची बॅग दोघांनी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 07:14 PM2020-08-06T19:14:18+5:302020-08-06T19:16:07+5:30

दोन्ही आरोपी चारचाकीतून पिशोर रोडने सुसाट वेगात निघुन गेले.

Lust for double the price; The two snatched a 4 lakh bag of ginger trader | दाम दुप्पटीच्या लालसेने केला घात; अद्रक व्यापाऱ्याची ४ लाखाची बॅग दोघांनी पळविली

दाम दुप्पटीच्या लालसेने केला घात; अद्रक व्यापाऱ्याची ४ लाखाची बॅग दोघांनी पळविली

googlenewsNext
ठळक मुद्देएक लाख रुपये जमा केले तर दुप्पट करून देतोओळखीचा गैरफायदा घेऊन केली फसवणूक

कन्नड : पैसे दुप्पट करून देतो या लालसेला बळी पडलेल्या आद्रक व्यापाऱ्याचे चार लाख रुपयाची बॅग दोन जणांनी पळवून नेल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पिशोर नाक्यावर घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, भानुदास काशिनाथ मगर रा. हिवरखेडा (नां.) ह. मु. चंद्रलोकनगरी, कन्नड असे फसगत झालेल्या आद्रक व्यापाऱ्याचे नाव आहे. बहिरगाव येथील संदीप पवार हा सुद्धा अद्रक व्यापारी असल्याने त्याची ओळख झाली. दहा बारा दिवसांपूर्वी संदीप पवारच्या आईने घरी बोलावून एक लाख रुपये जमा केले तर दुप्पट करून देतो असे सांगणाऱ्या महाराजाचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर पैसे जमा करू लागलो. बुधवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजे दरम्यान महाराजांनी अण्णाभाऊ साठे चौकात बोलावले. त्या ठिकाणी महाराजाची भेट झाली. 

महाराजासोबतच्या अनोळखी व्यक्तीसह मोटारसायकलवर ते घरी आले. त्याने एक मीटर कोरा कपडा घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यावर हळद कुंकू टाकुन ५०० रुपये किमतीच्या ८०० नोटा बॅगमध्ये भरून पिशोर नाक्यावरील एचडीएफसी बँकेसमोर तिघेही थांबले. त्याच वेळी फोनवर बोलत असतांना मगर यांचे लक्ष चुकवून मोटारसायकलला अडकवलेली ४ लाखाची बॅग घेवून महाराज आणि त्याचा साथीदार चारचाकीतून पिशोर रोडने सुसाट वेगात निघुन गेले. याप्रकरणी भानुदास मगर यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दिलीप तेजनकर करित आहेत.

Web Title: Lust for double the price; The two snatched a 4 lakh bag of ginger trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.