औरंगाबाद : मराठवाड्यात १ कोटी ४५ लाख ३३ हजार ४८० एवढी मतदार संख्या असून, हे मतदार ४६ मतदारसंघांतील सर्व पक्षीय उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. विभागीय प्रशासनाकडून जिल्हानिहाय मतदारसंख्येचा आढावा घेण्यात येत आहे, तसेच जिल्हा प्रशासनाची तयारी कुठल्या टप्प्यापर्यंत आली आहे, याची माहिती प्रशासन घेत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. एकाच टप्प्यात निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. २३ सप्टेंबरला निकाल जाहीर होईल. ४६ मतदारसंघांत निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात झाली आहे.
निवडणूक कामासाठी आवश्यक संख्याबळ, साधन सामग्री, मतदान केंद्रासाठी अधिकारी आढावा घेत आहेत. सध्या मराठवाड्यात १ कोटी ४५ लाख ३३ हजार ४८० मतदारांची नोंद असलेल्या याद्या तयार झाल्या आहेत. हे मतदार विभागातील ४६ मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. यामध्ये आणखी महिनाभरात मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे.
जिल्हानिहाय मतदारांची संख्या
नवमतदारांची नोंदणी वाढणार४६ मतदारसंघातील १ कोटी ४५ लाख ३३ हजार ४८० मतदार प्रत्येक मतदारसंघातील आमदार ठरविणार आहेत. यामध्ये नवमतदारांचे प्रमाण वाढले आहे. ७ लाखांच्या आसपास नवमतदारांची संख्या विधानसभा निवडणुकीत असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला. आणखी काही मतदारांची भर यामध्ये पडेल, अशी शक्यता आहे.