अभय मांगलिक मंडळातर्फे मानवसेवा कल्याणपर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:04 AM2021-05-24T04:04:36+5:302021-05-24T04:04:36+5:30
या उपक्रमांतर्गत अभय मांगलिक मंडळातर्फे शहरात १००८ गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत भरून दिले जाईल. तसेच रविवारी मंडळाच्या वतीने ...
या उपक्रमांतर्गत अभय मांगलिक मंडळातर्फे शहरात १००८ गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत भरून दिले जाईल. तसेच रविवारी मंडळाच्या वतीने प. पू. साध्वी अकृद्रजी म. सा. यांच्या हस्ते जोहरीवाडा येथील अरिहंत भवन येथे सकल जैन समाजातील ७२ कुटुंबांना एक महिन्याचे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
काही दिवसांपासून मंडळातर्फे कर्करोग रुग्णालयातही दररोज १५० व्यक्तींना मोफत जेवण दिले जात आहे. या रसोईघराला गुरुदेव प. पू. अभयदेव सुरीश्वर महाराज यांचे नाव दिले गेले असून, या उपक्रमाला सकल जैन समाजातील अनेक दानशूर व्यक्तींकडून हातभार लावला जात आहे. प्रकल्प प्रमुख रवी मुगदिया, संजय संचेती, आशिष जैन, राहुल डोसी, अभय मांगलिक मंडळ (औरंगाबाद), आनंदजी कल्याणजी श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट (जोहरीवाडा), जैन अलर्ट ग्रुप आणि सकल जैन समाज या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे.
फोटो ओळ :
मानवसेवा कल्याणपर्व अंतर्गत किराणा वाटप करण्यात आला.