छोट्या पंढरपुरात भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 08:23 PM2019-12-08T20:23:51+5:302019-12-08T20:23:55+5:30
विठ्ठलाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
वाळूज महानगर : मोक्षदा एकादशीनिमित्त रविवारी (दि.८) छोट्या पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मोक्षदा एकादशीनिमित्त येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात किर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाभिषेक व आरती करुन मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले.
परिसरातील भाविकांनी सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. दुपारी ह.भ.प. विजय महाराज पवार यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला. भाविकांची गर्दी व धार्मिक कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.