"आम्हाला फसवलं तर सरकारला डुबवणार"; मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:30 AM2024-06-21T11:30:02+5:302024-06-21T11:31:48+5:30
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली असून इशाराही दिला आहे.
Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून सोडोण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणासाठी आता लक्ष्मण हाके यांनीही आंदोलन सुरू केले आहे. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार जोरदार टीका केली असून इशाराही दिला आहे.
Bachchu Kadu : "माझ्या जीवाला धोका..."; आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र
मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आज ते बीड जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. यावेळी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. "बीडवरुन परत येऊन रुग्णालयात दाखल होणार आहे. ६ जुलैपासूनचा दौरा हा समाजासाठी असणार आहे.६ जुलैपासून १३ जुलैपर्यंत एकत्र येऊन ताकद दाखवणार आहेत. आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या, अशी सरकारला आम्ही विनंती करणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
"आम्हाला तसं आरक्षण द्यायचं नाही तर त्यांनी आमच्याकडे जज कशाला पाठवले होते. आमचं असंच तुम्हाला वाटोळ करायचं आहे का? त्यावेळी त्यांनी आम्हाला का सांगितलं नाही?, सवालही जरांगे पाटील यांनी केला. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे. ते टीकलेही पाहिजे, आम्हाला हैदराबादचे गॅझेटही लागू केले पाहिजे. आम्हाला नेहमी यांनी फसवले आहे. कितीही फसवणूक केली तरीही मी समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार, तुम्ही आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला डुबवले म्हणून समजायचे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
"तुम्ही गोड बोलून आम्हाला फसवत आहात, आता आम्ही तुमचा कार्यक्रम करणार आहे. सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे, असंही पाटील म्हणाले. आम्ही दोन टप्प्यातील चाचपणी केली आहे. सरकार जर आमच्याविरोधात अशीच आंदोलने उभा करत असेल तर आम्हालाही २८८ उभा करण्याचा विचार करावा लागणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.