औरंगाबादेत संताप; मराठा क्रांती मोर्च्याकडून गोयलांविरोधात जोडे मारो आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 04:22 PM2020-01-13T16:22:06+5:302020-01-13T18:09:53+5:30
राज्यभरात या पुस्तकाचे लेखक गोयल आणि भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने 'आजके शिवाजी:नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे लेखक व भाजपचे नेते जय भगवान गोयल यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत होते. राज्यातील अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. राज्यभरात या पुस्तकाचे लेखक गोयल आणि भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
औरंगाबादमधील पुंडलिक नगर येथे छञपती शिवाजी महाराज चौकात लेखक गोयल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो करून त्यांच्या पुतळा जाळण्यात आला. तसेच या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. तर जय भगवान गोयल यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावे. तसेच या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.अन्यथा मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने संपुर्ण महाराष्ट्रात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी यावेळी दिला.
आंदोलनात रवींद्र काळे, अशोक मोरे, किरण काळे, राहुल पाटील, अभिजीत औटे, शुभम केरे, संकेत शेटे, अजय गटाने, धनंजय देशमुख, विशाल विरळे, शुभम खानझोड, तेजस पवार, रूषी बनकर, प्रतिक पाटील, विशाल निळ, स्वराज गिरे, तेजस खरात आदींचा सहभाग होता.
लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
छञपती शिवाजी महाराजांची तुलना कोनासोबतच होऊ शकत नाही. त्यांच्या सोबत पंतप्रधानांची तुलना करणे हा खोडसाळपणा आहे. यामुळे भाजप नेत्यांनी शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. महाराजांचा अपमान करणे व दोन समाजात दुफळी निर्माण करणे हेच भाजपाचे यामागील राजकारण आहे. याप्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन लेखकावर देशद्रोहीचा खटला दाखल कराव व पुस्तकावर तक्ताळ बंदी घालवी, अन्यथा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने संपुर्ण महाराष्ट्रात तिव्र आंदोलन करण्यात येईल .
- रमेश केरे पाटील, मुख्य समन्वयक