म्हाडाच्या सदनिकांची विभागालाच नाही माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:45 AM2017-09-03T00:45:39+5:302017-09-03T00:45:39+5:30

येथील एनटीसी परिसरात म्हाडाअंतर्गत २0१३ मध्ये जाहीरात काढून उभारण्यात येणाºया ११२ सदनिकांचे काम २0१७ मध्येही पूर्ण नाही. शिवाय त्याची माहिती देण्यासाठीही औरंगाबाद येथील संबंधित कार्यालयात कोणी उपलब्ध नसल्याने ही कामे पूर्ण होणार की, अशीच लटकणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

The MHADA department has no information about the department | म्हाडाच्या सदनिकांची विभागालाच नाही माहिती

म्हाडाच्या सदनिकांची विभागालाच नाही माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील एनटीसी परिसरात म्हाडाअंतर्गत २0१३ मध्ये जाहीरात काढून उभारण्यात येणाºया ११२ सदनिकांचे काम २0१७ मध्येही पूर्ण नाही. शिवाय त्याची माहिती देण्यासाठीही औरंगाबाद येथील संबंधित कार्यालयात कोणी उपलब्ध नसल्याने ही कामे पूर्ण होणार की, अशीच लटकणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हिंगोली येथे आधीच कोणते मोठे प्रकल्प नाहीत. त्यातच गोरगरिबांसह आरक्षणनिहाय मिळणाºया सदनिकांसाठी अनेकांनी मोठ्या उत्साहात अर्ज सादर केले. त्याची लॉटरी पद्धतीने सोडत झाली. त्यानंतर निवड झालेल्यांची यादी लावून ही कामे सुरू केली. यात घर मिळालेल्या जवळपास लोकांनी यासाठी रक्कमही भरलेली आहे. मात्र या कामाला गतीच नाही. म्हाडाचे स्थानिकला कार्यालय नाही. शिवाय औरंगाबाद येथून या विभागाचा कारभार चालतो. ते अधिकारीही इकडे फिरकत नाहीत. येथे अधिकारी ठेवला. मात्र निधी व इतर बाबींचे अधिकार औरंगाबादच्या कार्यालयाकडेच असल्याने त्यांचे काहीच चालत नाही. तर औरंगाबाद येथील कार्यालयात या प्रकल्पाची माहिती द्यायलाही कोणी तयार नाही. हिंगोली शहरात आणखी एक नवा प्रकल्प उभारण्याची तयारी करणाºया म्हाडाचा जुनाच प्रकल्प गटांगळ्या खात असल्यास नव्या प्रकल्पाला कोणी विचारणारही नाही. म्हाडाच्या औरंगाबाद कार्यालयातील अधिकारी हिंगोलीचा कारभार नेमका कुणाकडे आहे, हेही सांगायला तयार नाहीत. तर ही घरे आता पूर्ण कधी होणार? याचे उत्तरही कोणी द्यायला तयार नाही. त्यातील अडचणीही समोर येत नसल्याने लाभार्थी मात्र एनटीसीत येवून पाहून जातात. मोक्याच्या ठिकाणी मिळणाºया या सदनिकांमुळे अनेकांनी इतर ठिकाणी बांधकामाच्या फंदात न पडता यात गुंतवणूक केली, त्यांना अजूनही भाड्याच्या घरात राहावे लागत आहे.

Web Title: The MHADA department has no information about the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.