म्हैसमाळ, लामणगावातील १०० हून अधिक जनावरे दगावली

By Admin | Published: July 17, 2016 12:24 AM2016-07-17T00:24:22+5:302016-07-17T00:33:32+5:30

खुलताबाद : तालुक्यातील म्हैसमाळ-लामणगाव येथील शंभराहून अधिक दुभत्या जनावरांचा गेल्या तीन दिवसांत अज्ञात आजाराने मृत्यू झाला आहे.

More than 100 animals in Mhasamal, Lampangav | म्हैसमाळ, लामणगावातील १०० हून अधिक जनावरे दगावली

म्हैसमाळ, लामणगावातील १०० हून अधिक जनावरे दगावली

googlenewsNext

खुलताबाद : तालुक्यातील म्हैसमाळ-लामणगाव येथील शंभराहून अधिक दुभत्या जनावरांचा गेल्या तीन दिवसांत अज्ञात आजाराने मृत्यू झाला आहे. मृत जनावरांमुळे म्हैसमाळच्या डोंगरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे पशुपालकांत एकच खळबळ उडाली आहे.
साधारण दीडशे घरांचे उबंरठे असलेल्या म्हैसमाळात घरटी जनावरे असल्याने गावात हजार- बाराशे गायी, म्हैशी, बैल आदी जनावरे आहेत. गेल्या तीन दिवसांपासून म्हैसमाळच्या डोंगरात चरण्यासाठी गेलेली जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने, थंडीने जनावरे दगावली असल्याचे काहींचे म्हणणे आह,े तर या उन्हाळ्यात जनावरांना चारा नसल्याने कुपोषित झालेली जनावरे दगावली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्लास्टिक पिशव्या, कॅरिबॅग खाल्ल्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडल्याचे काही पशुपालकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत शंभरच्या आसपास जनावरे दगावली असून, अनेक जनावरे आजारी असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
म्हैसमाळ येथील लक्ष्मण मुरलीधर रानडे यांची २० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. रवींद्र कचरू सातदिवे यांची १४, दिनेश भारती १३, मिलिंद कचरू सातदिवे १, अनिल सोनाजी बनकर ३, रावसाहेब कचरू सातदिवे ४, दीपक कचरू सातदिवे २, लक्ष्मण सुखलाल बनकर १, मगन गुलाब बोहरे ९, भरत रामसिंग बोहरे ५, भरत नंदराम महेर २, विठ्ठल भुरासिंग काकस २, रमेश भारती १२, भीमराव आसाराम कदम ३, दत्तू धोंडिबा हरणे २, परसराम देवचंद महेर २, बालचंद लालचंद महेर १, कोंडिराम गुलाब बोहरे ४, मोहनलाल गिरी २, नंदू शांताराम भारती ४, सोनाजी बनकर ४, सुधाकर बनकर ४, लक्ष्मण बनकर २, रघूकाका जाधव १, लक्ष्मण शंकर मोटे २, लक्ष्मण सांडू मालोदे ५, गुमानसिंग श्यामसिंग बोहरे ५, विनोद मोहन जाधव ५, सखाराम मोहन २, अनिल प्रभाकर मालोदे २, भरतसिंग रामसिंग बोहरे ३, देवा काका जाधव ३, गोवर्धन शंकर बोहरे १, कल्याण लालचंद महेर १, परसराम देवचंद महेर २, गिरजाराम धोंडिराम बनकर ४, संजय नंदराम महेर ३, शंकर नंदराम महेर ७, भागन लक्ष्मण मालोदे ४, कारभारी आसाराम मालोदे २, कैलास किसन (पान ५ वर)

Web Title: More than 100 animals in Mhasamal, Lampangav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.